एक्स्प्लोर

नावात काय असतं? पण नावामुळेच जॅक माच्या कंपनीला तब्बल 26 अब्ज डॉलरचा फटका; जाणून घ्या प्रकरण

Alibaba Jack Ma : नाम साधर्म्यामुळे जॅक मा यांच्या अलीबाबा कंपनीला तब्बल 26 अब्ज डॉलरचा फटका बसला आहे.

Alibaba Jack Ma : नावात काय आहे, असं अनेकजण म्हणत असतात. मात्र, नावाचे महत्त्व आणि त्याची किंमत चीनमधील उद्योजक आणि अलीबाबा या ई-कॉर्मस कंपनीाचा मालक जॅक मा याला कळून चुकली आहे. नावाच्या साधर्म्यामुळे अलीबाबा कंपनीला काही मिनिटांत तब्बल 26 अब्ज डॉलरचा फटका बसला. सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. 

मागील काही महिन्यांपासून उद्योजक जॅक मा आणि चीन सरकारमध्ये चांगले संबंध नाहीत. आर्थिक धोरणांवर टीका करून जॅक मा याने चीन सरकारची नाराजी ओढावून घेतली आहे. अलीबाबा या ई-कॉमर्स कंपनीचा संस्थापक असलेल्या जॅक मा हा कधीकाळी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. मात्र, चीन सरकारची नाराजी ओढावून घेतल्यानंतर जॅक मा याचे दिवस फिरले आहेत. 

कसा बसला 26 अब्ज डॉलरचा फटका

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधील सरकारी वृत्तवाहिनीने मा नावाच्या एका व्यक्तीला 25 एप्रिल रोजी चीनच्या सुरक्षा यंत्रणांनी हेंग्झू शहरातून ताब्यात घेतले. या व्यक्तीविरोधात चीनविरोधी शक्तींशी हातमिळवणी करून सरकारविरोधात कट रचल्याचा आरोप आहे. ही बातमी समोर येताच, हाँगकाँगमधील गुंतवणूकदारांनी अलीबाबा कंपनीचे शेअर विकण्यास सुरुवात केली. शेअर विक्रीमुळे अलीबाबाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. काही क्षणातच कंपनीच्या बाजार भांडवलात 26 अब्ज डॉलरची घसरण झाली. 

मा नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेल्या हेंग्झू शहरात अलीबाबा कंपनीचे कार्यालय आहे. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती ही अलीबाबा कंपनीची संस्थापक नसल्याचे 'ग्लोबल टाइम्स'च्या माजी संपादकाने स्पष्ट केले. मात्र, तोपर्यंत अलीबाबाच्या शेअरमध्ये 9.4 टक्क्यांची घसरण झाली होती. जॅक मा याला ताब्यात घेण्यात आले नसल्याचे समोर येताच अलीबाबाचा शेअर सावरू लागला होता. 

शालेय शिक्षक ते उद्योजक असा प्रवास करणाऱ्या जॅक मा हे चीनमधील अनेकांसाठी प्रेरणास्थानी होते. मात्र, त्यांनी चीन सरकारच्या आर्थिक धोरणाबाबत टीका केल्यानंतर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सरकारकडून विविध पातळींवर चौकशी सुरू करण्यात आली. चीन सरकारवर टीका केल्यानंतर जॅक मा हे काही महिने अज्ञातवासात होते. त्यावेळी अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Santosh Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! PSI आणि आरोपीच्या भेटीचा CCTV
Beed Santosh Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! PSI आणि आरोपीच्या भेटीचा CCTV
Santosh Deshmukh VIDEO : आदल्या दिवशी आरोपी आणि PSI राजेश पाटलांची हॉटेलमध्ये भेट, दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांचा मर्डर; पोलिसांना सगळंच माहिती होतं का? 
आदल्या दिवशी आरोपी आणि PSI राजेश पाटलांची हॉटेलमध्ये भेट, दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांचा मर्डर; पोलिसांना सगळंच माहिती होतं का? 
Rapper Badshah : अल्लू अर्जुननंतर आता रॅपर बादशाह सुद्धा पोलिस कारवाईत अडकला! नेमकं प्रकरण काय?
अल्लू अर्जुननंतर आता रॅपर बादशाह सुद्धा पोलिस कारवाईत अडकला! नेमकं प्रकरण काय?
Chhagan Bhujbal : वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप, समर्थकांसमोर सगळंच काढलं!
वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप, समर्थकांसमोर सगळंच काढलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Santosh Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! PSI आणि आरोपीच्या भेटीचा CCTVUddhav Thackeray and Devendra Fadnavis Meeting : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीलाShambhuraj Desai : उद्धव ठाकरे नार्वेकरांच्या केबिनमध्ये असताना शंभूराज देसाईंची एन्ट्रीUddhav Thackeray Meets Devendra Fadnavis :उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस भेटीचा, EXCLUSIVE VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Santosh Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! PSI आणि आरोपीच्या भेटीचा CCTV
Beed Santosh Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! PSI आणि आरोपीच्या भेटीचा CCTV
Santosh Deshmukh VIDEO : आदल्या दिवशी आरोपी आणि PSI राजेश पाटलांची हॉटेलमध्ये भेट, दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांचा मर्डर; पोलिसांना सगळंच माहिती होतं का? 
आदल्या दिवशी आरोपी आणि PSI राजेश पाटलांची हॉटेलमध्ये भेट, दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांचा मर्डर; पोलिसांना सगळंच माहिती होतं का? 
Rapper Badshah : अल्लू अर्जुननंतर आता रॅपर बादशाह सुद्धा पोलिस कारवाईत अडकला! नेमकं प्रकरण काय?
अल्लू अर्जुननंतर आता रॅपर बादशाह सुद्धा पोलिस कारवाईत अडकला! नेमकं प्रकरण काय?
Chhagan Bhujbal : वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप, समर्थकांसमोर सगळंच काढलं!
वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप, समर्थकांसमोर सगळंच काढलं!
IPO Listing: दोन आयपीओच्या लिस्टिंगनं स्टॉक मार्केटमध्ये तुफान, सेन्सेक्स कोसळत असताना गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
दोन आयपीओच्या लिस्टिंगनं स्टॉक मार्केटमध्ये तुफान, सेन्सेक्स कोसळत असताना गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
Uddhav Thackeray Video: बुके देऊन उद्धव ठाकरे निघाले, फडणवीस म्हणाले या बसा; नागपुरातील भेटीत नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Video: बुके देऊन उद्धव ठाकरे निघाले, फडणवीस म्हणाले या बसा; नागपुरातील भेटीत नेमकं काय घडलं?
Raj Kapoor : जेव्हा नर्गिस यांनी राज कपूरसाठी थेट तत्कालिन गृहमंत्री मोरारजी देसाईंना फोन फिरवला होता! दोघांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत का झाला?
जेव्हा नर्गिस यांनी विवाहित राज कपूरसाठी तत्कालिन गृहमंत्री मोरारजी देसाईंना फोन फिरवला होता! दोघांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत का झाला?
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?
Embed widget