एक्स्प्लोर

Jack Ma | अलिबाबा समूहाचे सर्वेसर्वा जॅक मा दोन महिन्यांपासून बेपत्ता

चीनच्या बँकिंग व्यवस्थेवर टीका केल्यानंतर जॅक मा (Jack Ma) बेपत्ता झाल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे जगभरातून चीनच्या हुकुमशाहीवर बोट ठेवण्यात आलं आहे.

पेइचिंग : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा (Jack Ma) हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. काही दिवसांपूर्वी जॅक मा यांनी चीनच्या बँकिंग व्यवस्थेवर टीका केल्यानंतर जॅक मा कुठेही दिसलेले नाहीत. कोरोना काळात विविध देशांना मदत करणारे जॅक मा अचानक बेपत्ता झाल्यामुळे चीनच्या हुकुमशाहीवर पुन्हा एकदा जगभरातून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

जॅक मा यांनी चीनची बँकिंग व्यवस्था आणि सरकारी बँकांसंदर्भात बोलताना ऑक्टोबरमध्ये शांघाईत दिलेल्या भाषणात टीका केली होती. जगभरातील कोट्यवधी लोकांचा आदर्श असलेले जॅक मा यांनी सरकारला आव्हान दिलं होतं. त्यांनी चीनमधल्या बँकिंग व्यवस्थेवर, व्यापारांवर आणि अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. जॅक मा यांच्या भाषणानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. तेव्हापासून जॅक मा यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात येत होता. तसेच जॅक मा यांनी स्थापन केलेला अलिबाबा समूहावर कारवाई करण्यात आली होती. एवढंच नाहीतर जॅक मा यांच्या इतर उद्योगांवरही कारवाई करण्यात आल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे.

चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या आदेशानंतर जॅक मा यांच्यावर कारवाई

नोव्हेंबर महिन्यात चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांच्यावर कारवाई करत धक्का दिला. जॅक मा यांच्या एंट ग्रुपचे 37 अब्ज डॉलर्सचे आयपीओ निलिंबित केले. वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार, जॅक मा यांच्या एंट ग्रुपचे आयपीओ रद्द करण्याचे आदेश थेट चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या वतीने देण्यात आले होते. त्यानंतर जॅक मा यांना ख्रिसमसच्या आदल्या दिवशी जॅक मा यांच्यावर देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली. जोपर्यंत अलिबाबा समूहावर करण्यात आलेली कारवाई सुरु आहे, तोपर्यंत जॅक मा देशाबाहेर जाऊ शकत नाहीत, असं चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांना सांगितलं होतं.

त्यानंतर जॅक मा त्यांचा प्रसिद्ध टीव्ही शो 'अफ्रीका बिजनेस हीरोज' यातही नोव्हेंबरपासून दिसलेले नाहीत. एवढंच नाहीतर या शोमधूनही जॅक मा यांचा फोटो हटवण्यात आला आहे. अलिबाब समूहाचे प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅक मा यांना चिनी सरकारसोबत झालेल्या वादानंतर शोमधील परिक्षकांच्या पॅनलमधून पायउतार करण्यात आलं आहे. दरम्यान, या शोच्या फायनलपूर्वी काही आठवड्यांआधी जॅक मा यांनी एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटमध्ये ते म्हणाले होते की, ते सर्व स्पर्धकांच्या भेटीची प्रतिक्षा करु शकत नाहीत. त्यानंतर पासून त्यांच्या तिनही ट्विटर अकाउंटवरुन एकही ट्वीट करण्यात आलेलं नाही.

सत्ताधाऱ्यांविरुद्ध भाष्य करणाऱ्यांना शांत करण्याचा चिनचा इतिहास

चिनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे चिनमधील सत्ताधाऱ्यांनी जॅक मा यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे. परंतु, चिनमध्ये हे पहिल्यांदाच घडत नसून याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. याआधीही सरकार विरोधात बोलणाऱ्या अनेकांना चिनमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. याआधी शी जिनपिंग सरकारवर टीका करणारे प्रॉपर्टी बिजनसमन रेन झिकियांग अचानक बेपत्ता झाले होते. त्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शी जिनपिंग यांना सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांना 18 वर्षांसाठी कारागृहात पाठवण्यात आलं होतं. चीनचे अरबपती शिआन जिआनहुआ वर्ष 2017 पासून नजरकैदेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget