Moham Review: प्रेयसीचा खुन करण्याच्या विचारानं झपाटला; 1 तास 51 मिनिटांच्या फिल्ममध्ये माथेफिरू प्रेमाचा थरार

Moham Review: गेल्या काही वर्षांमध्ये टॉक्सिक मस्कुलॅनिटी दाखवणारे बरेच सिनेमे आले. अर्जुन रेड्डी (२०१७), एनिमल (२०२३) हे सर्वात जास्त चर्चिले गेले. यह मेरी बंदी है किंवा तू ही ज़रिया, तू ही मंजिल है, असं म्हणत तिला प्रेमात जकडायचं. हा सोयीस्कर पुरुषी प्रस्पेक्टिव्ह दिसतो. तिच्यावर याचा नक्की काय परिणाम होत असेल? या टॉक्सिक प्रेमाचा स्विकार - अस्विकार करताना ती नक्की कुठल्या मानसिक स्थितीतून जात असेल? याचं उत्तर हवं असेल तर फाजिल रजाकचा मोहम (२०२५) हा सिनेमा पाहायला हवा. नुकत्याच रशियात पार पडलेल्या ४८ व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये मोहम (२०२५) सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरलाय. शिवाय अमृता कृष्णकुमारला सर्वोतम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. (Moham Review)
काय आहे कथानक?
एक मानसिक संतुलन बिघडलेली मुलगी आणि नाकारणाऱ्या प्रेयसीचा खुन करण्याच्या विचारानं झपाटलेला एक माथेफिरु तरुण. असे दोघे एकत्र येतात. त्याला प्रेयसीला गोळ्या घालून ठार मारायचंय. त्यासाठी पिस्तुल हवंय. त्याचे पैसे जमवण्यासाठी तो या वेडसर मुलीची मदत घेतो. या मुलीला म्हणजेच आमलाला स्कूटरबद्दल प्रचंड आकर्षण आहे. लहानपणी वडिलांच्या स्कूटीवर बसून तिनं सुंदर जग अनुभवलंय. शानू बेरोजगार आहे. त्याचं एका झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या मुलीवर प्रेम आहे. शानू स्वकैंद्री आहे. आमलाच्या भूतकाळात घडलेल्या घटनांमुळं तिचं भान हरवलंय. पुढचं कथानक या दोघांच्या पिस्तुल मिळवण्याच्या प्रयत्नांचं आहे.
टॉक्सिक मस्कुलॅनिटीचा उतारा
आमलाचा भूतकाळ आणि शानूचा वर्तमान दोन्हीची परिणिती सारखीच आहे. इथं फाजिल रजाकच्या मोहमची पोजिशन महत्वाची आहे. या दोन्ही मिसफिट कॅरेक्टर्सना क्लोजर देण्याच्या प्रक्रियेत फाजिलनं टॉक्सिक मस्कुलॅनिटीचा उदोउदो करणाऱ्यांना आरसा दाखवलाय.
स्त्री आणि पुरुष प्रेम भावनेनं एकत्र येतात. या संबंधात एकमेकांना पुरक राहणं अपेक्षित असतं. पण पुरुषसत्ताक समाजात स्त्री-पुरुष संबंधात 'ती' हक्क गाजवण्याचं साधन ठरते. याने नातेसंबंधांचा समतोल बिघडतो आणि होत्याचं नव्हतं होतं. विस्कटतं. हक्क गाजवणारा पुरुष तिचं नुकसान करतो. एखादी सामना करते . वेगळी होते. पण तेही त्याला पटत नाही. ती संपली तरच आपलं प्रेम संपेल अश्या मानसिकतेत तो येतो. मोहम याच सर्व बाजूंना अगदी सोप्प करुन दाखवतो. माथेफिरु प्रेम हे कधीच पॅशननेट नसतं. ते घाताकडे जाणारं असतं. सिनेमातून येणारं हे ग्लोरीफाईंग टॉक्सिक प्रेम घातक आहे. या टॉक्सिक मस्कुलॅनिटीचा उतारा फाजिल रझाकचा मोहम देतो.
ट्रेंडिंग न्यूज





















