Alex Jones : 2012 मध्ये अमेरिकेतील (America) कनेक्टिकटमधील सँडी हुक एलीमेंट्री शाळेत गोळीबार झाला होता त्यात 20 मुलं सहा शाळेचे कर्मचारी मारले गेले होते. तो सगळा प्रकार खोटा/फेक आहे, बंदुकांवरील निर्बंध वाढवता यावेत कायदे बदलता यावेत यासाठी अमेरिकन सरकारने कलाकारांना घेऊन हे नाटक रचलं आहे अशी थिअरी त्यावेळी एलेक्स जोन्सने (Alex Jones) मांडली होती. त्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या पालकांनी एलेक्स जोन्सच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. आता एलेक्स जोन्सला 45.2 मिलियन डॉलर्सचा दंड टेक्सासमधील एका ज्युरीनं ठोठावला आहे. त्याव्यतिरिक्त $4.1 दशलक्ष नुकसान भरपाई द्यायचा आदेश देखील देखील एलेक्सला देण्यात आला आहे. 


जोन्सने त्याच्या वेबसाइट इन्फोवॉर्सवर आणि लोकप्रिय रेडिओ शोवर गेली काही वर्ष दावा केला की, न्यूटाउन कनेक्टिकटमधील गोळीबार घटनेत 20 मुले मारली गेली, हे खोटं होता, परंतु त्यानंतर हे खरे असल्याचे त्याने कबूल केले.


एलेक्स जोन्स हा 48 वर्षाचा आहे. सँडी हुक शाळेतील हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या पालकांनी एलेक्स जोन्सवर केलेल्या मानहानीच्या खटल्यांमध्ये तो दोषी अढळले आहे. या प्रकरणातील फिर्यादी असणारे सहा वर्षांचा मुलगा जेसीचे पालक नील हेस्लिन आणि स्कारलेट लुईस यांनी 150 मिलियन डॉलर्सची नुकसानभरपाई मागितली होती. 


कोण आहे एलेक्स जोन्स?


एलेक्स जोन्सचा जन्म फेब्रुवारी 1974 मध्ये टेक्सास येथे झाला होता. नंतर त्याचे कुटुंब ऑस्टिन येथे स्थलांतरित झाले. त्याचे वडील डेनटिस्ट होते. कॉलेजमध्ये शिकत असताना एलेक्स जोन्सला षड्यंत्र सिद्धांतांची आवड निर्माण झाली. तो स्थानिक रेडिओ स्टेशनमध्ये नोकरी करत होता.


1993 मध्ये वाको शहराजवळ एका समुदायातील लोक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. ही चकमक 51 दिवस चालली. यामध्ये 86 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जोन्सने या चकमकित मृत्यूमुखी पडलेल्या लोकांसाठी निधी उभारला आणि एक चर्च बांधले. या घटनेमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. 


वाचा इतर बातम्या: