(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जगभर प्रवास करा आणि काम करा; 'या' कंपनीची कर्मचाऱ्यांना 170 देशातून काम करण्यास मुभा
Work From Aboard Home : अमेरिकेतील Airbnb कंपनीने कर्मचार्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'सह 170 देशांतून काम करण्याची मुभा दिली आहे.
Work From Aboard : अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को येथील Airbnb कंपनीने कर्मचार्यांना त्यांच्या पसंतीनुसार कार्यालय, घर किंवा देशाच्या कोणत्याही भागातूनस कोठूनही काम करण्याची परवानगी देणार असल्याचे म्हटले आहे. कर्मचाऱ्यांच्या निर्णयाचा परिणाम त्यांच्या पगारावर होणार नसल्याचेही कंपनीने म्हटले.
Airbnb कंपनीने म्हटले की, त्यांचा कर्मचारी वर्षातील 90 दिवसापर्यंत 170 देशांमध्ये वास्तव्य करू शकतात आणि तेथून काम करू शकतात. कर्मचाऱ्यांना या दरम्यान कर आणि पगाराच्या संबंधित बाबीसाठी कायमस्वरूपी पत्ता कंपनीला द्यावा लागणार असल्याचे सीईओ ब्रायन चेस्की यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले.
>> सीईओ ब्रायन चेस्की यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये पाच महत्त्वाच्या मुद्यांवर जोर दिला आहे.
1. वर्क फ्रॉम होम / ऑफिस
कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी कंपनीने लवचिक धोरण स्वीकारले आहे. अधिक चांगले काम करण्यासाठी कर्मचारी आपल्या कामाचे ठिकाण ठरवू शकतात. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी काही मोजक्याच लोकांची ऑफिसमध्ये आवश्यकता भासणार आहे.
2. देशातील कोणत्याही भागातून काम करा
कर्मचारी देशातील कोणत्याही भागातून काम करू शकतात. आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी ते हा पर्याय वापरू शकतात. तुम्ही कोणत्याही ठिकाणाहून काम केले तरी त्याचा परिणाम तुमच्या पगारावर होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. कमी खर्चिक ठिकाणाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे वेतन ठरवले असल्यास जून महिन्यापासून अशा कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत बदल केला जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
3. .जगभर प्रवास करा आणि काम करा
Airbnb कर्मचारी हे सप्टेंबर महिन्यापासून 170 देशांमध्ये वर्षाला 90 दिवस राहू शकतात आणि काम करू शकतात. परदेशातून काम करताना त्या संबंधित कर्मचाऱ्याला आपल्या कामाच्या परवान्याची (Work Permit) जबाबदारी घ्यावी लागणार. अधिकाधिक कर्मचाऱ्यांना परदेशातून काम करता यावे यासाठी कंपनीकडून स्थानिक प्रशासन, सरकारसोबत चर्चा करण्यात येणार असल्याचेही कंपनीने म्हटले. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी परदेशातून काम करता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
4. ऑफिस पार्टी, उपक्रमांचे काय?
विविध ऑफिसेसमध्ये सण, उत्सव साजरे करण्यासह कर्मचाऱ्यांसाठी पार्टी उपक्रम राबवले जातात. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिल्याने हे उपक्रम मोजकेच होणार असल्याचे कंपनीने म्हटले. महासाथ अजूनही पूर्णपणे संपली नसल्याने मर्यादित प्रमाणात उपक्रम, ऑफिस पार्टीचे आयोजन केले जाणार आहे. पुढील वर्षापासून यामध्ये वाढ होणार असल्याचे कंपनीने म्हटले.
5. समन्वयाने काम करा
काम करण्याच्या ठिकाणाबाबत लवचिक धोरण कंपनीने स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांनी लवचिकपणे काम करण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे. चांगले काम होण्यासाठी अधिक समन्वयाची आवश्यकता असल्याचे कंपनीने म्हटले.