Bunk Beds on Long Haul Flights : एअर न्यूझीलंड (Air New Zealand) ही न्यूझीलंडची विमान कंपनी लवकर प्रवाशांसाठी बंक बेड फ्लाईट सुरु करण्याच्या तयारीत आहे. एअर न्यूझीलंड लांबच्या फ्लाईटसाठी बंक बेड ही नवीन संकल्पना आणणार आहे. लांब अंतराच्या विमान प्रवासामुळे अनेकदा थकायला होतं आणि पुरेशी झोपही मिळत नाही. त्यामुळे एअर न्यूझीलंडने प्रवाशांसाठी नवीन योजना आखली आहे. लांब प्रवास करणाऱ्या लोकांचा प्रवास लवकरच सुखकर होईल. एअर न्यूझीलंडने 2024 पर्यंत लांब पल्ल्यांच्या मार्गावरील विमानांमध्ये फ्लॅट स्लीपिंग पॉड्स सुरु करण्याची योजना आखली आहे.


लवकरच इकोनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठी बंक बेड फ्लाईटची सुविधा उपलब्ध होईल. यामुळे प्रवाशांचा अति लांब पल्ल्यांच्या वेळीचा त्रास दूर होईल. प्रवाशांना दूरच्या विमान प्रवासावेळी बंक बेडमध्ये आरामशीर झोपेचा आनंद घेता येईल. यासाठी नवीन छोट्या केबिन तयार करण्यात येतील. या छोट्या बंक बेडला लाय-स्लीपिंग पॉड्स (Lie-Flat Sleeping Pod) असं म्हटलं आहे. यामध्ये प्रवाशांना चार तासासाठी बुकींग करता येईल. प्रवासी फ्लाईट दरम्यान चार तासांचं सत्र बूक करू शकतील. 




इकोनॉमी बंक बेड तयार करणारी एअर न्यूझीलंड ही जगातील पहिली विमान कंपन ठरेल. प्रवाशांनी अतिरिक्त खर्चात लाय-फ्लॅट स्लीपिंग पॉड्समध्ये चार तासांची सत्रं बुक करता येतील. याला एअरलाइनने 'स्कायनेस्ट' (Skynest) असं नाव दिलं आहे. या पॉड्समध्ये एक गादी आणि चादरी असतील. जे प्रत्येक बुकिंग संपल्यानंतर पुढच्या प्रवाशासाठी केबिन क्रू  गादी आणि चादरी बदलतील. प्रत्येक पॉडमध्ये पडदा, यूएसबी चार्जिंग आणि व्हेंटिलेशन आउटलेट्स असतील.




एअर न्यूझीलंडच्या बोईंग ड्रीमलाइनर विमानातमध्ये सहा स्कायनेस्ट पॉड्स बसवण्यासाठी जागा तयार करण्यासाठी पाच इकॉनॉमी सीट्स काढल्या जातील. तेथे हे पॉड्स अर्थात बंक बेड बसवले जातील. प्रत्येक प्रवासी किती सत्र बूक करू शकतो, याचं प्रमाण असेल. एका प्रवाशाला चार तासाचे एकच सत्र बूक करता येईल. कारण इकॉनॉमी क्लासमध्ये 200 पेक्षा जास्त प्रवासी असतात. अशा
वेळी सर्व प्रवाशांना पॉड्सचा लाभ घेता येईल.


लाय-स्लीपिंग पॉड्स बंक बेडप्रमाणे असल्यामुळे हे आर्थिक दृष्ट्या सोयीस्कर ठरेल. एअर न्यूझीलंडने लांब प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ही नवीन योजना आखली आहे. यामुळे प्रवाशांनी आरामदायी प्रवास करता येईल, असं कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.


संबंधित इतर बातम्या