Trending News : सोशल मीडियावर क्षणार्धात कोणालाही प्रसिद्धी मिळू शकते. एखादा व्हिडीओ सोशल मीडियावर काही सेकंदात व्हायरल होतात. सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल काही सांगता येत नाही. अशा व्हायरल व्हिडीओंमुळे अनेक लोक चर्चेतही येतात. सध्या असेच एक आजोबा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. एका आजोबांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.


सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती भन्नाट डान्स करताना दिसत आहे. या आजोबांनी केलेला डान्स अगदी तरुणाईला लाजवेल. हा व्हिडीओ पाहून अभी तो मैं जवान हू्ँ वाक्याची प्रचिती येते. वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करणाऱ्या आजोबांना वयाचं कोणतंह बंधन नाही. या व्हिडीओमध्ये आजोबा गाणी ऐकण्याचा मनमुराद आनंद घेत मजेत डान्स करताना दिसत आहेत.







या व्हायरल व्हिडीओमध्ये आजोबांनी चक्क मायकल जॅक्सनची हूक स्टेपही कॉपी केल्याचं तुम्ही पाहू शकता. हे आजोबा एका मागोमाग एक भन्नाट डान्स स्पेप करताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ गुडन्यूज मूव्हमेंट नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये वृद्ध व्यक्ती कंबर हलवत मायकल जॅक्सन आणि शकीराची स्टेप करताना दिसत आहे. हे पाहून तिथे उपस्थित लोकही आनंदाने खूश झाले आहेत. 


वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओला 22 लाखांहून अधिक युजर्सनी पाहिलं असून  97 हजारांहून अधिक युजर्सनी लाईक केलं आहे. या व्हिडीओवर यूजर्स सतत कमेंट करत आजोबांचं कौतुक करत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या