एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उत्तर कोरियात बोगद्यामधील अणूचाचणीत 200 जणांचा बळी
3 सप्टेंबर रोजी उत्तर कोरियात सहावी आणि सर्वात मोठी भुयारी अणूचाचणी झाली होती.
याँगयांग (उ. कोरिया) : उत्तर कोरियात घेण्यात आलेल्या अणूचाचणीत अंदाजे 200 जणांचा बळी गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बोगद्यामध्ये अणूचाचणी घेताना हा अपघात घडल्याची माहिती एका जपानी वृत्तवाहिनीने दिली आहे.
3 सप्टेंबर रोजी उत्तर कोरियात सहावी आणि सर्वात मोठी भुयारी अणूचाचणी झाली होती. त्यानंतर काहीच दिवसात चाचणी झाली त्या ठिकाणापासून जवळ असलेल्या पुंगे-री या भागात बोगदा कोसळला होता.
यावेळी जवळपास 100 कामगारांनी प्राण गमावल्याचं आसाही टीव्हीने सांगितलं. बचावकार्य सुरु असताना पुन्हा दुर्घटना होऊन 200 जणांचा बळी गेल्याचा दावा, या चॅनेलने केला आहे. अणूचाचणी आणि बोगदा अपघात यांचा परस्पर संबंध असल्याचा दावा आसाही टीव्हीने केला आहे.
भुयारी अणूचाचण्यांमुळे डोंगर कोसळू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. उपग्रहांमधून काढलेल्या फोटोंवरुन या दोन्ही घटनांमध्ये संबंध असल्याचा दावा केला जात आहे. 2006 नंतर झालेली ही सहावी अणूचाचणी होती. यामुळेच भूस्खलन झाल्याचं म्हटलं जात आहे.
अणूस्फोटानंतर 6.3 रिष्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला, तर लगेचच 4.1 रिष्टर क्षमतेचा भूकंपाचा दुसरा धक्का बसला, असं यूएसच्या भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षणात म्हटलं आहे.
1945 मध्ये हिरोशिमावर पडलेल्या अणूबॉम्बच्या आठपट क्षमतेचा- 120 किलोटनचा हायड्रोजन बॉम्ब असल्याचं जपानने तपासलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement