एक्स्प्लोर

'हृतिक नोटीस मागे घे नाहीतर...', कंगनाचं अल्टीमेटम

मुंबई: अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हृतिक प्रकरणाची दिशा बदलण्याचा आणि मीडिया ट्रायलचा आधार घेत असल्याचा आरोप कंगनाने केला आहे. सोबतच कंगनाने हृतिकला कायदेशीर नोटीस मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. तसं न केल्यास कारवाईचा सामना करण्यास तयार राहा असंही तिनं बजावलं आहे.   'जर हृतिकनं ती नोटीस मागे घेतली तर कंगना हे प्रकरण इथंच संपविण्यास तयार आहे.' अशी माहिती कंगनाचे वकील रिजवान सिद्दकी यांनी दिली.   आपली प्रतिमा खराब केल्याप्रकरणी हृतिक रोशनने कंगनाला नोटीस बजावली, तर कंगनाने हृतिक रोशनच्या नोटिशीला उत्तरादाखल आणखी एक नोटीस पाठवली होती.   वकील रिझवान सद्दिकी यांच्या मार्फत कंगनाने ऋतिक रोशनला 21 पानांची नोटीस पाठवली आहे. ऋतिकने आपल्याला धमकावल्याचा आरोप या नोटिशीमधून कंगनाने केला आहे.   काय आहे नेमकं प्रकरण:   पत्रकार परिषद घेऊन कंगनाने जाहीर माफी मागावी, अशी मागणी हृतिक रोशनने कंगनाला पाठवलेल्या नोटिशीतून केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना- ह्रतिकमध्ये कोल्ड वॉर सुरु आहे.   काही दिवसांपूर्वी कंगनाने हृतिकला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला होता की, काहीजण प्रसिद्धीसाठी माझ्या नावाचा वापर करतायेत.   कंगनाचं हे वक्तव्य गंभीरपणे घेत हृतिकने तिला नोटीस पाठवलीय. जाहीर पत्रकार परिषदेत माफी मागावी, अशी मागणी हृतिकने केली आहे.   डिसेंबर, 2014 मध्ये पहिला गुन्हा   – डिसेंबर, 2014 मध्ये सायबर पोलिसात दाखल केलेल्या तक्रारील हृतिक ने म्हटलं होतं की, त्याच्या नावाने अज्ञात व्यक्ती फॅनसोबत बोलत आहे.   – मात्र त्यावेळी हृतिकने कंगनाचं नाव घेतलं नव्हतं. कारण तिचं नाव घेतलं असतं चौकशीसाठी कंगनालाही बोलावलं असतं.   कंगनाची बहिण रंगोलीलाही समन्स   – सायबर क्राईम पोलिसांने कंगनाची बहिण रंगोलीलाही समन्सही बजावला आहे.   – कंगना आणि कथित बनावट ई-मेलर यांच्यात झालेल्या मेलमधील मजकुराची माहिती रंगोलीला आहे, असं म्हटलं जात आहे.   – त्यामुळे रंगोलीलाही सात दिवसांच्या आत जबाब नोंदवण्यास सांगितलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, कंगना आणि बनवट मेलर यांनी एकमेकांना हजारो मेल केले आहेत.   – मी हा ई-मेल आयडी वापरत नव्हतो, असा दावा हृतिकने केला आहे. तर कंगनाचं म्हणणं आहे की, हृतिकच हा ई-मेल आयडी वापरत होता.   – या ई-मेलमध्ये अनेक खासगी व्हिडीओ आणि चॅटचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे.   बनावट ई-मेल आयडीचा खुलासा कधी झाला?   – हृतिकच्या FIR नुसार, हे प्रकरण 24 मे, 2014 रोजी करण जोहरच्या बर्थ डे पार्टीत समोर आलं होतं.   – क्वीनमधील कंगनाच्या कामाचं कौतुक केल्याबद्दल कंगनाने हृतिकचे आभार मानले होतं.   – यावर हृतिक म्हणाला की, मी सिनेमाच पाहिला नाही. शिवाय मी ई-मेलद्वारे कधीही तुझ्याशी (कंगना) बातचीत केली नाही, अंसही हृतिकने कंगनाला सांगितलं होतं.   हृतिक कोणत्या ई-मेल आयडीबाबत बोलत आहे?   – डिसेंबर 2014 मध्ये हृतिकने सायबर सेलमध्ये एक लेखी तक्रार दाखल केली होती. त्याच्या तक्रारीनुसार, माझा पर्सनल ई-मेल आयडी hroshan@imac.com आहे, तर कंगना hroshan@email.com या ई-मेल आयडीच्या संपर्कात होती.   – तर कंगनाचा दावा आहे की, “या ई-मेल आयडीवरुन हृतिकने माझ्याशी बातचीत केली होती. यानंतर कंगनाने या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी,” अशी मागणी हृतिकने कायदेशीर नोटीस पाठवून केली होती.   – त्यानंतर कंगनानेही हृतिक रोशनला नोटीस पाठवली होती.   संबंधित बातम्या:

हृतिक-कंगनाच्या भांडणात नवा ट्विस्ट

कंगना, पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी माग: ह्रतिक रोशन

कंगना केस जिंकल्यास हृतिकला 10 वर्षांचा तुरुंगवास?

'मी एकवेळ पोपशी अफेअर करेन..' ट्वीटमुळे हृतिकला नोटीस

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
Delhi Metro : CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
Embed widget