एक्स्प्लोर

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 88 लोकल गाड्यांना 3 महिन्यांचा ब्रेक; प्रवाशांना नेमका काय फटका बसणार?

Goregaon to CSMT Services to Be Affected for Three Months: गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची लोकल सेवा पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात येणार आहे.

Mumbai Local Alert: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना पुढील तीन महिने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतची लोकल रेल्वे सेवा पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम 88 दैनंदिन लोकल गाड्यांवर होईल. याबाबत नियोजन सुरू आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती आहे.  

गेल्या काही महिन्यांपासून वेस्टर्न रेल्वेमध्ये रिडेव्हलेपमेंटचं काम सुरू आहे. वांद्रे आणि खारदरम्यानचा जुना रेल्वे पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल आणि बोरिवली दरम्यान,  पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात हा पूल  महत्त्वाचा आहे. उपनगरीय रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढवणे,  रेल्वेची गर्दी कमी करणे आणि भविष्यात प्रवाशांना उत्तम सेवा देणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. सुरूवातीला या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती होती. परंतु, प्रवांशाची होणारी गैरसोय लक्षात घेता, हे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.

लोकल सेवा विस्कळीत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी डिसेंबर ते जानेवारीदरम्यान, कांदिवली ते बोरिवली सेक्शनमधील पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या बांधकामादरम्यान, दररोज 200 ते 250 लोकल गाड्या रद्द करण्यात येत होत्या. आता तो टप्पा पूर्ण झाल्यानंतर याचे काम गोरेगाव ते सीएसएमटी विभागाकडे वळले आहे. जे तांत्रिकदृष्ट्या अधिक आव्हानात्मक मानले जात आहे.

प्रवाशांना थोडा दिलासा

दरम्यान, वांद्रे ते सीएसएमटीदरम्यान, लोकल ट्रेन सेवा सुरू राहिल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.  वांद्रे आणि बोरिवलीदरम्यान, पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम आधीच पूर्ण झाले आहे.  त्यामुळे या विभागातील रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार नाही.

प्रकल्प किती मोठा?

पश्चिम रेल्वेच्या  या विस्तार प्रकल्पाला अंदाजे, 964.84 कोटी खर्च आला आहे.  काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. भविष्यात प्रवाशांना चांगल्या कनेक्टिव्हिटीचा फायदा होईल.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
Vaibhav Sooryavanshi : 15 नाही तर 17-18 वर्षांचा असेल, तरी...; वैभव सूर्यवंशीच्या वयावरून वाद; भल्याभल्या फलंदाजांना धडकी भरवणारा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नेमकं काय म्हणाला?
15 नाही तर 17-18 वर्षांचा असेल, तरी...; वैभव सूर्यवंशीच्या वयावरून वाद; भल्याभल्या फलंदाजांना धडकी भरवणारा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नेमकं काय म्हणाला?
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Nashik Pune Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget