ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ, सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार झळ, नेमका किती आहे दर?
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला अधिकची झळ बसणार आहे. वाशिममध्य ठोक बाजारात साखरेचे दर सुमारे 5 हजार 200 प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत
Sugar Prices News : ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला अधिकची झळ बसणार आहे. वाशिममध्य ठोक बाजारात साखरेचे दर सुमारे 5 हजार 200 प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. दरम्यान, किरकोळ बाजारात अनेक ठिकाणी साखर जवळपास 54 ते 55 रु प्रति किलो दराने विकली जात आहे. आठ दिवसा पूर्वी साखरेचे दर 4 हजार 400 रु प्रति क्विंटल ठोकचे भाव होते. मात्र, बाजारात साखरेची आवक घटल्याने हे दर वाढल्याची माहिती मिळत आहे.
मागणीच्या तुलनेत साखरेची आवक कमी त्यामुळं दरात वाढ
गेल्या हंगामात साखर उत्पादनात घट झाली होती. घाऊक आणि किरकोळ बाजारातील मागणी विचारात घेता सध्या बाजारात होत असलेली साखरेची आवक अपुरी आहे. साखर कारखानदारांकडे साखरेचा साठा कमी आहे. व्यापारी साखरेची साठवणूक करु शकत नाहीत. तेवढी जागाही व्यापाऱ्यांकडे उपलब्ध नाही. मागणीच्या तुलनेत साखरेची आवक कमी होत असल्याने दरवाढ झाल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे.
साखेरेच्या साठ्याबाबत सरकारचा नवा नियम (Sugar Stock Limit)
नव्या नियमांनुसार घाऊक व्यापारी, किरकोळ विक्रेते तसेच मोठ्या मॉल्सना कमाल 4,000 क्विंटल साखरेचाच साठा ठेवता येणार आहे. तसेच व्यापाऱ्यांनी साखर मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत तिची विक्री करणे बंधनकारक असेल. म्हणजेच, साखरेचा साठा दीर्घकाळ गोदामात ठेवून कृत्रिम टंचाई निर्माण करता येणार नाही. याशिवाय, व्यापाऱ्यांना दर आठवड्याला सरकारी संकेतस्थळावर त्यांच्या ताब्यात किती साखर शिल्लक आहे, याची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात बाजारात साखरेचा पुरेसा पुरवठा राहावा आणि ग्राहकांना योग्य दरात साखर मिळावी, हा या निर्णयामागील उद्देश आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई- (Sugar Stock Limit Marathi News)
आवश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत जारी करण्यात आलेल्या या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अन्न विभागाचे अधिकारी गोदामांवर छापे टाकून 30 दिवसांपेक्षा जुना साखरेचा साठा जप्त करू शकतात. याशिवाय संबंधित व्यापाऱ्याचा व्यवसाय परवाना आणि DFPD पोर्टलवरील नोंदणी रद्द केली जाऊ शकते. दोषी आढळल्यास मोठा दंड तसेच 3 ते 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते. या कारवाईपासून बचाव करण्यासाठी व्यापाऱ्यांनी बाजारात 20 ते 25 दिवसांत सहज विक्री होईल, इतकाच साखरेचा साठा कारखान्यांकडून उचलावा. व्यापाऱ्यांनी गरजेपेक्षा जास्त माल खरेदी करून तो गोदामात साठवू नये आणि कृत्रिम टंचाई निर्माण करू नये, हा या नियमामागील सरकारचा मुख्य उद्देश आहे.
भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार
ब्राझीलपाठोपाठ, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश आहे. देशांतर्गत मागणीपेक्षा साखरेचे उत्पादन अधिक होईल, या अंदाजाने भारताने यापूर्वी साखर कारखान्यांना 15 लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात करण्यास परवानगी दिली होती. तथापि, आता असा अंदाज वर्तवला जात आहे की, साखर उत्पादक प्रमुख क्षेत्रांमध्ये उसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी साखरेचे उत्पादन देशांतर्गत खपाहून कमी पडेल.
Before You Go
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा






















