Wardha News : वर्ध्यात चार मुले अचानक बेपत्ता; अपहरण की आणखी काही? पोलिसांचा तपास सुरू
Wardha News : जिल्ह्यात मुलं पळविणारी टोळी सक्रिय झाली आहे का? किंवा यामागे नेमके कारण काय? याचा पोलीस तपास घेत आहेत.
Wardha News : वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाणे (Wardha Selu Police Station) अंतर्गत येणाऱ्या आकोली मसाळा येथील चार मुले काल दुपारपासून बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
बेपत्ता मुलांचा पोलिसांकडून शोध
वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आकोली मसाळा येथील चार मुले काल दुपारपासून बेपत्ता झाली आहेत. या संदर्भात सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस पथक बेपत्ता मुलांचा शोध घेत आहेत. काल मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी श्वान पथकासह मुलांचा जंगल परिसरात शोध घेतला मात्र मुले सापडले नाहीत. आज परत पोलिसांकडून मुलांचा शोध घेणे सुरू आहे. पप्पू देवढे (13) संदीप भुरानी(8),राज येदानी(13),राजेंद्र येदानी(12) अशी या मुलांची नाव आहेत.
मध्यरात्री पर्यंत पोलिसांची शोधमोहीम
यातील पप्पू देवढे या मुलाच्या वडिलांनी त्याला याला शाळेतून अंदाजे 11 वाजता घरी आणले. त्यानंतर ते शेतात कामाकरिता गेले सायंकाळी पाच वाजता पर्यंत घरी आले असता त्यांना त्यांचा मुलगा घरी दिसून आला नाही. त्यांनी परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला तेव्हा परिसरातील हे चारही मुलं बेपत्ता असल्याचं कळलं. गावातील नागरिकांनी मुलांचा शोध घेतला मात्र मुले सापडली नाही, त्यानंतर पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली. अद्यापही मुले पोलिसांना सापडले नाहीत.
घटनेमागील कारण अद्यापही अस्पष्टच
या घटनेमागे नेमके कारण काय? हे अद्यापही अस्पष्टच आहे. जिल्ह्यात मुलं पळविणारी टोळी सक्रिय झाली आहे का? किंवा या मुलांना काही मानसिक त्रास झाला का? किंवा त्यांचे अपहरण झाले का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होताच सेलू पोलिसांनी अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक स्वतः वेगवेगळे पथक स्थापन करून मुलांचा शोध घेतला जातं आहे. तसेच जिल्हा सीमांवर नाकाबंदी करून तपासणी केल्या जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Cyber frauds : चीनी माफियांकडून भारतीय तरूणांची फसवणूक, नोकरीच्या आमिषाने म्यानमारच्या जंगलात छळ
Cambodia Cryptocurrency Fraud : महाराष्ट्रातील तरुण अडकला कंबोडियात, गुलामगिरीतून स्वत:सह सात भारतीयांची 'अशी' केली सुटका