Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरून द्या, 50 रुपये मिळवा; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Ladki Bahin Yojana : नोंदणी करणाऱ्या घटकांना प्रति फॉर्म 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूदही या योजनेतंर्गत करण्यात आली आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : वर्धा : महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) राज्यभरातील महिलांसाठी अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. या सर्व योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) योजना. या योजनेसाठी गावागावांत, जिल्ह्यात यांसारख्या अनेक ठिकाणी महिलांची झुंबड उडाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची प्रभावी आणि सुलभ अंमलबजावणीसाठी राज्य शासनानं योजनेची व्याप्ती वाढवली आहे. त्यानुसार यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. नोंदणी करणाऱ्या घटकांना प्रति फॉर्म 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूदही या योजनेतंर्गत करण्यात आली आहे. यासंदर्भात वर्धा जिल्हा प्रशासनानं माहिती दिली आहे.
अर्ज करण्यासाठी अडचणी, सरकारकडून पुन्हा मोठा बदल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेनं व्हावी याबाबत या योजनेच्या अटींमध्ये आता नव्यानं सुधारणा करण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी महिलांना वेगवेगळ्या पद्धतीनं फॉर्म भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. महिला नारीशक्ती, पोर्टल या वेगवेगळ्या माध्यमातून हा अर्ज करू शकतात. याआधी महिलांना अर्ज करताना आपला लाईव्ह फोटो द्यावा लागायचा. पण आता नव्या निर्णयाअंतर्गत तशी गरज भासणार नाही, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
नव्या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणं सोपं व्हावं यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच आता महिलांना फॉर्म भरताना आता स्वत:चा लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही.
योजनेचा अर्ज करण्यासाठी काय करायचं?
पात्र महिला योजनेसाठी घरी बसूनच ऑनलाईन अर्ज करु शकतात. त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा पीडीएफ अर्ज डाऊनलोड करावा लागणार आहे. त्यात आपलं नाव, पत्ता, बँकेची माहिती, आधार कार्ड नंबर आणि इतर सर्व गोष्टी भरव्या लागणार आहेत. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पुन्हा वेबसाईटवर अपलोड करावा लागणार आहे. बँके खातं नमूद करताना ज्या खात्यात तुम्हाला रक्कम हवी आहे, तेच खातं द्यावं लागणार आहे. त्यात बँकेचं नाव, खातेधारकाचं नाव, बँक खाता क्रमांक, बँकेचा आयएपएससी कोड भरावा लागणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, तुमचं आधार कार्ड त्या बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :