Walmik Karad: वाल्मिक कराडच्या चौकशीला सुरुवात; त्या दोघांनाही सीआयडीने बोलावलं, बीडमध्ये नेमकं काय घडतंय?
Walmik Karad Surrender: सीआयडीकडून आज वाल्मिक कराडच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.
Walmik Karad Surrender: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी (Santosh Deshmukh Murder Case) संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मिक कराडला (Walmik Karad) 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. मंगळवारी (31 डिसेंबर) रात्री उशीरानं झालेल्या सुनावणीत कराडला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आजपासून सीआयडीने वाल्मिक कराडची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
सीआयडीकडून आज वाल्मिक कराडच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी केला जात आहे. सीआयडी कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडच्या चौकशीचा आज पहिला दिवस आहे. एका बंद खोलीत वाल्मिक कराडची चौकशी केली जात आहे. खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या 2 भावांनाही चौकशीसाठी सीआयडीने बोलावलं आहे.
मस्साजोगच्या गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन-
बीडमध्ये मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी गावकऱ्यांचं मागील दोन तासांपासून जलसमाधी आंदोलन सुरु आहे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना आरोपींना अटक करा, अशी मागणी गावकऱ्यांची आहे. या जलसमाधी आंदोलनात तीन महिलांना चक्कर आली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांकडून इतर आंदोलकांना बाहेर येण्याचं आवाहन करण्यात येत आहे. परंतु गावकरी मात्र आंदोलनावर ठाम आहेत. बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षकही आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांवर प्रश्नांचा भडिमार केला. आरोपींना कधी पकडणार याची तारीख सांगा असा सवाल त्यांनी विचारला.
अवैध वाहतुकीतून कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा केल्याचे होतात आरोप-
वाल्मिक कराड यांनी बीड जिल्ह्यात स्वत:ची अशी समांतर यंत्रणा निर्माण केली होती. सुरेश धस यांच्यासारख्या नेत्यांनी वाल्मिक कराड यांनी बीड जिल्ह्यात हजारो एकर जमिनी विकत घेतल्याचा दावा केला होता. इतक्या मोठ्याप्रमाणावर जमिनी विकत घेण्याची आर्थिक ताकद वाल्मिक कराड यांच्याकडे कशी आली, हा प्रश्न अनेकांना पडला. या प्रश्नाचे उत्तर म्हणजे राखेतून मिळालेली ऊर्जा. वाल्मिक कराड यांच्यावर सध्या पवनचक्की निर्माण करणाऱ्या कंपनीकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी परळी औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून निघणाऱ्या राखेच्या अवैध वाहतुकीतून कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा केल्याचे आरोप होतात. या राखेतून मिळालेल्या उर्जेमुळे वाल्मिक कराड यांची राजकीय ताकद वाढली होती, असे सांगितले जाते.
वाल्मिक कराड नेमका कुठे होता?, VIDEO:
संबंधित बातमी:
वाल्मिक कराड स्वत:हून शरण का आला?; कोर्टात वकिलाच्या युक्तिवादानंतर उलगडलं रहस्य