Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 18 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाचे सैन्य युक्रेनच्या विविध शहरांवर सतत हल्ले करत आहे. रशियन सैन्याकडून बॉम्बसह क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे युक्रेनमधील परिस्थिती अतिशय बिकट होत चालली आहे. युक्रेनमध्ये नुकतेच एका महिलेवर रशियन रणगाड्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात या महिलेसह तिची आई आणि चालकाचा मृत्यू झाला आहे.
युक्रेनमधील एक महिला तिच्या आजारी आईसाठी औषधे आणण्यासाठी बाहेर गेली होती. यावेळी रशियन सैनिकांनी त्यांच्यावर बॉम्ब हल्ला केला. यात व्हॅलेरिया मॅकसेटस्का नावाच्या महिलेसह तिची आजारी आई इरिना आणि चालक यारोस्लाव यांचा मृत्यू झाला आहे.
मॅक्सेत्स्का ही महिला युक्रेनधील नागरिकांना मदत करत होती. परंतु,तिच्या आईची काही औषधे संपल्यामुळे तिने किव्हमधून बाहेर पडून शेजारील गावातून औषधे आणण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी ती कीव्ह शहराच्या पश्चिमेकडील रस्त्यावर रशियन सैन्य निघून जाण्याची वाट पाहत होते. यावेळी रशियाच्या एका रणगाड्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचाही मृत्यू झाला आहे.
दरम्यान, युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये बिकट स्थिती आहे. रशियाकडून सतत होत असलेल्या हल्ल्यामुळे काही इमारती भग्नावस्थेत बदलल्या आहेत. तर शाळा आणि रुग्णालयांवर हल्ले होत आहेत. रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीव्हला तीन बाजूंनी वेढा घातला आहे. शिवाय रशियन सैन्य मारियुपोल आणि ब्रोवरी येथे सतत हल्ले करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Russia-Ukraine Crisis: रशियाचा युक्रेनमधील लष्करी तळावर हवाई हल्ला, 35 जणांचा मृत्यू
- Ukraine-Russia War: पत्नीला खोटं बोलून घरातून निघाला, अन् युक्रेन सैन्यात सामील झाला
Russia Ukraine War : दोन अमेरिकन शास्त्रज्ञ अनेक महिन्यांपासून रशियन कॅप्सूलमध्ये बंद, बाहेर सुरु असलेल्या युद्धाची कल्पनाच नाही
- Ukraine Russia War : सुमी शहरातील विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी भारतीय दूतावासाची योजना, भारतीयांना तयार राहण्याच्या सूचना