Viral Video :   आजकाल सोशल मीडिया हे जगभरातील कलाकार आणि कलागुणांना ओळख देण्यासाठी एक व्यासपीठ बनले आहे. पूर्वी लोकांना त्यांची कला आणि कौशल्ये सादर करण्यासाठी फार पैसे मोजावे लागत असत. परंतु, आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ हे काम अगदी सहज सोपे झाले आहे. 


नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक फूड आर्टिस्ट एक अप्रतिम केक बनवताना दिसत आहे. या केककडे पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. व्हिडिओमध्ये हा आर्टिस्ट केकचे डिझाईन अशा काही प्रकारे करताना दिसतोय की ते नक्की कमळ आहे की केक हे ओळखणं कठीण झालं आहे.     


पाहा हा व्हिडीओ :






फूडप्रेमींनी सोशल मीडियावर या व्हिडीओला खूप पसंती दाखवली आहे. या व्हिडीओमधील आर्टिस्ट केकचं इतकं बारकाईने वर्णन करतोय की कोणालाही आश्चर्यच वाटेल. व्हिडीओच्या शेवटी आर्टिस्टने केक कापून खाऊन दाखवला. जे पाहून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले. तसेच, कमेंट्समध्ये अनेकांनी हा केक खाण्याची इच्छा व्यक्त केली. आतापर्यंत या व्हिडीओला 13 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत. केक बनवणाऱ्या आर्टिस्टचे मोठ्या संख्येने यूजर्स कौतुक करत आहेत. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha