Russia-Ukraine Crisis : रशियाने रविवारी युक्रेनवर मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात 35 लोक ठार झाले असून 134 जण जखमी झाले आहे. युक्रेनमधील ल्विव्ह येथील लष्करी तळाला लक्ष्य करून रशियाने हा हवाई हल्ला केला आहे.


ल्विव्हचे राज्यपाल मॅक्झिम कोझित्स्कींच्या हवाल्याने रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनमधील ल्विव्हजवळील लष्करी तळावर हवाई हला केला आहे. या हल्ल्यात 35 लोक ठार झाले आहेत. तर 134 जण जखमी झाले आहेत. युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनीही ट्विटरवरून या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.  


राज्यपाल मॅक्सिम कोजित्स्की यांनी या हल्याबाबत आपल्या फेसबुकवरूनही माहिती दिली आहे. रविवारी पहाटे पावणे सहा वाजता ल्विव्ह मधील यावोरीव तळावर दोन मोठे स्फोट झाले. रशियाने यावोरीव तळावर 30 पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे डागली आहेत. यात 35 लाकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, असे कोजित्स्की यांनी म्हटले आहे.  


दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 18 वा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर  अजूनही हल्ले सुरूच आहेत. तर दुसरीकडे युक्रेनकडूनही जोरदार प्रतिकार केला जात आहे. या युद्धात आतापर्यंत रशियाचे 13 हजार पेक्षा जास्त सैनिक मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे. 


रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून जगभरातील अनेक देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही रशियावर नवीन निर्बंध लादले आहेत. यावेळी बायडन यांनी रशियन गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे रशियन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा दावा जो बायड यांनी केला आहे.


महत्वाच्या बातम्या