(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Armaan Malik : दोन बायका फजिती ऐका... अरमान मलिकनं दोन्ही प्रेग्नेंट बायकांच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ चर्चेत
Youtuber Armaan Malik : युट्यूबर अरमान मलिकने डोहाळ जेवणाआधी दोन्ही बायकांच्या कानशिलात लगावली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Armaan Malik Slapped His Pregnant Wives : प्रसिद्ध युट्यूबर (Youtuber) अरमान मलिक (Armaan Malik) त्याच्या पर्सनल लाईफमुळे चांगलाच चर्चेत असतो. अरमान मलिकच्या दोन बायका असून त्या दोघीही गरोदर आहेत. अरमान दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. अलिकडेच अरमान मलिकच्या दोन्ही प्रेग्नेंट बायकांच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला. पण याआधी काही कारणावरून अरमान मलिकला राग आणि त्याने दोन्ही पत्नींच्या कानाखाली लगावली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अरमाननं दोन्ही प्रेग्नेंट बायकांच्या कानशिलात लगावली
अरमानच्या दोन्ही पत्नी कृतिका आणि पायल यांच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दोघीही ट्विनिंग ड्रेसमध्ये दिसल्या. कृतिका आणि पायल दोघींचे अगदी कपड्यांपासून ते ज्वेलरी आणि कानातले अगदी सेम-टू-सेम होते. इतकंच नाहीतर दोघींची हेअरस्टाईलची सेम होती. याचं कारणावरून सवतींमध्ये भांडण लागलं. यावेळी अरमान मलिकला राग अनावर झाला आणि त्याने दोन्ही बायकांच्या कानाखाली मारली.
दोघींचं भांडण पाहून अरमान भडकला
अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका हिने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, कृतिका आणि पायल डोहाळ जेवणासाठी तयार होत असताना त्यांच्यात वाद होतो. हा वाद इतका वाढला, त्यांनी पाहुण्यांसमोरच बाचाबाची झाली. दोघींमधील वाद इतका वाढला की, अरमानमध्ये आला. त्यानंतर त्यालाही राग अनावर झाला.
पायल आणि कृतिकाच्या कानाखाली मारली
पायल आणि कृतिकाच्या भांडणामध्ये अरमान पडला, पण दोघींचं भांडण ऐकून तोही भडकला. त्याने दोघींवर ओरडण्यास सुरुवात केली. यानंतर राग अनावर झाल्याने रागाच्या भरातच त्याने पायल आणि कृतिका दोघींच्या कानशिलात लगावली. त्यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ खरा नसून एक प्रँक व्हिडीओ (Prank Video) आहे. अरमान आणि त्याच्या बायकांनी मिळून मनोरंजनासाठी हा व्हिडीओ तयार केला आहे.
कोण आहे अरमान मलिक?
अरमान मलिक एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. अरमान युट्यूब (YouTube) आणि इंस्टाग्रामवर (Instagram) मनोरंजक व्हिडिओ शेअर करत असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरमान मलिकने 2011 मध्ये पायलसोबत लग्न केले. त्यानंतर 2018 मध्ये पायलची बेस्ट फ्रेंड कृतिकासोबत लग्न केले. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :