Viral Video : बापरे बाप! तरूणाने पकडला विषारी साप, व्हिडीओला येत आहेत लाखो हिट्स
सध्या समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरूण न घाबरता विषारी सापाला पकडत असल्याचं दिसून येतं आहे. या व्हिडीओला पाहून तुम्ही तरूणाच्या हिंमतीला दाद दिल्याशिवाय राहणार नाही.
Viral Video: साप म्हटलं तरी नुसता आपली भंबेरी उडते, अनेकजण तर भीतीने सैरभैर होतात. पण काहीजण असे असतात की त्यांना सापाची भीती वाटत नाही. अशाच एका तरुणाने विषारी साप अगदी सहजपणे पकडला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये एका पाण्याच्या पाईपलाईनमध्ये जाऊन बसलेल्या सापाला या तरूणानं हातानं पकडल्याचं दिसतंय. तसेच या व्हिडीओत साप पकडणाऱ्या तरूणासोबत दुसरे दोन तरुण दिसून येत आहेत. या तरूणानं पाईपलाईनमधील अजस्त्र सापाला न घाबरता अगदी सहजपणे हातानं पकडल्याचं दिसून येतय. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो हिट्स आले असून अनेक लोकांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
या विषारी सापाला पकडणारा तरूण
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला तरूण दिसून येत आहे. हा तरुण पाण्याच्या पाईपलाईनमधून एका विषारी सापाला बाहेर ओढून काढताना दिसून येत आहे. या तरूणानं सापाला बाहेर काढल्यानंतर तेथे उपस्थित इतर दोन तरूण घाबरून पळ काढताना दिसून येत आहेत. पण या अजस्त्र सापाला न घाबरता तो तरुण त्याला आपल्या हातानं पकडताना दिसून येतं आहे. या तरूणानं आपल्या हातानं सापाचं शेपूट पकडले आणि त्याला आपल्या शरीरापासून सुरक्षित अंतर राखत एका हातानं हवेत लटकलं. यावेळी या तरूणांच्या चेहेऱ्यावर भीतीचे कोणतेही भाव नसून सहज सापाला पकडताना दिसून येत आहे. त्यामुळे लोकांनी तरूणाच्या हिंमतीला दाद दिला आणि सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केले.
View this post on Instagram
हा व्हिडीओ आतापर्यंत 1 कोटी 76 लाख लोकांनी पाहिला
या व्हायरल व्हिडीओमधील अजस्त्र आणि विषारी सापाला पकडलेलं पाहून काही लोकांना नक्कीच घाम फुटला असणार. हा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 6 लाख 56 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं असून जवळपास 1 कोटी 76 लाखांहून जास्तवेळा पाहिलं आहे. यावरून तरूणानं पकडलेल्या अजस्त्र सापाचा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
ही बातमी वाचा: