एक्स्प्लोर

टीव्ही पाहून आणि 3 तास झोपून लाखो रुपये कमावते ही महिला; म्हणते, 'ही' जगातील सर्वोत्तम नोकरी

World News: जगात एक महिला अशीही आहे, जी टीव्ही पाहण्यासाठी आणि झोपण्यासाठी काम करते. आश्चर्याची बाब म्हणजे या कामासाठी तिला चांगला पगारही मिळतो.

Trending News: जर एखाद्याला श्रीमंत (Rich) व्हायचं असेल तर त्याला कठोर परिश्रम (Efforts) करावे लागतात आणि म्हणूनच लोक म्हणतात की पैसा (Money) हा कष्टाने कमवावा लागतो. पण एक महिला अशीही आहे जी फक्त झोपून, टीव्ही बघून आणि लहान मुलांसोबत खेळून मोठी कमाई करते. आता तुम्ही विचार करत असाल की असं करून ती कसे बरं पैसे कमवत असेल? तर ही महिला 'केअर टेकर' म्हणून काम (Job) करते, ज्यात तिला श्रीमंत कुटुंबातील लहान मुलांची काळजी घ्यायची असते, याच गोष्टीसाठी तिला पगार (Salary) दिला जातो.

नोकरीबद्दलचा आनंद शब्दांत केला व्यक्त

कॅली नावाच्या या महिलेने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओत ही महिला तिला या नोकरीतून खूप समाधान मिळत असल्याचं सांगते. ती म्हणते, मी करत असलेली नोकरी ही जगातील सर्वोत्तम नोकऱ्यांपैकी एक आहे. ती सांगते की, दुपारी तिला मुलांसोबत बसून टीव्ही पाहावा लागतो. इतकंच नाही तर त्यांना सांभाळताना तिला मध्ये दुपारी तीन तास झोपही मिळते, त्यामुळे एकूणच हे काम सर्वोत्कृष्ट म्हणता येईल.

कसा असतो कॅलीचा एकूणच दिवस?

आपल्या दैनंदिन कामांची माहिती देताना कॅली म्हणते, श्रीमंत लोकांच्या घरी केअर टेकर म्हणून काम करणं ही सर्वात चांगली गोष्ट आहे. लोकांना तिच्या दैनंदिन जीवनाची अपडेट देताना कॅली म्हणते की तिचं काम सर्वात सोपं आहे.

स्टारबक्समध्ये बसून पिते कॉफी

सर्वप्रथम ती मुलांसोबत बसून टीव्ही पाहते, त्यानंतर ती मुलांना सोडण्यासाठी शाळेत जाते. त्यानंतर सर्वात छोटा मुलगा हॅम्प्टन याच्यासोबत बसून ती स्टारबक्समध्ये कॉफी पिते. ती छोट्या हॅम्प्टनला स्टारबक्समधून केक देखील घेऊन देते.

शाळेतून परतल्यावर दोघेही कॅलीच्या जिममध्ये जातात, तिथे कॅली जिम करते आणि हॅम्प्टन खेळतो. जिम केल्यानंतर कॅली अंघोळ करून तयार होते. हे सर्व करून नंतर काही लोकांना भेटून दोघेही घरी परततात. शाळेतून आल्यावर कॅली हॅम्पटनसोबत जेवते आणि नंतर थोडा वेळ ते दोघं खेळतात.

दुपारी तीन तास मिळते झोप

यानंतर कॅलीला जे काम करण्यात सर्वात जास्त आनंद मिळतो, ते काम ती करते आणि ते म्हणजे, कॅली आणि हॅम्प्टन घरी आल्यावर जेऊन तीन तास झोपतात. या वेळेत घरगुती कामं करणारे दुसरे गडी संपूर्ण घर स्वच्छ करतात आणि कपडे धुतात. अशा प्रकारे कॅलीचं काम संध्याकाळपर्यंत संपतं.

कॅलीला किती पगार मिळतो?

कॅलीने तिला या कामासाठी किती पैसे मिळतात हे सांगितलेलं नाही. पण अमेरिकेत श्रीमंत कुटुंबात केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या महिलांचा सरासरी पगार 30 लाख रुपये आहे. यावरून कॅलीला मिळणाऱ्या पगाराचा अंदाज तुम्ही लाऊ शकता.

हेही वाचा:

Rajasthan: चमत्कार म्हणावा की आणखी काय? राजस्थानमध्ये जन्मलेल्या बाळाला तब्बल 26 बोटं; कुटुंबीय चकित

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar news: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
VIDEO: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Karnataka Policy Regarding Digital Usage: कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनी पदाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी
Maharashtra Live blog updates: महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनी पदाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
Embed widget