Brick Fact : विटा लाल रंगाच्या का असतात? यामागे आहे 'हे' कारण
Interesting Brick Fact : वीट भाजताना त्यात असलेल्या घटकांमध्ये काही रासायनिक क्रिया घडतात, ज्यामुळे त्याचा रंग लाल होतो. याबाबत अधिक जाणून घ्या.
Why is Color of Brick is Red : आपल्याकडे एक छोटसं का होईन एक घर (House) असावं, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यासाठी लोक आयुष्यभर कष्ट करतात आणि पैसे वाचवतात. घर (Construction of House) बांधण्यासाठी सिमेंट (Cement), लाकूड (Wood), लोखंड (Iron), वीट (Brick) इत्यादी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीट (Brick). मोठमोठ्या इमारती असो किंवा घर ते बनवण्यासाठी विटांचा वापर केला जातो. वीट लाल रंगाची असते, हे तुम्ही पाहिले असेलच. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, विटेचा रंग फक्त लालच का असतो? काळा, निळा, पिवळा किंवा हिरवा अशा इतर कोणत्याही रंगाच्या विटा का नसतात? विटांच्या रंगामागील कारण जाणून घेऊया.
विटांमध्ये 'हे' घटक असतात
विटा तयार करण्यासाठी गुळगुळीत पिवळी माती वापरली जाते. विटा बनवण्याच्या मातीमध्ये 50 ते 70 टक्के वाळू असते. याशिवाय त्यात 20 ते 30 टक्के अॅल्युमिना, 2 ते 5 टक्के चुना, 1 टक्के मॅग्नेशियम आणि 7 टक्के लोह असते. ही माती विटा बनवण्यासाठी साच्यात टाकून त्याला विटेचा आकार दिला जातो. काही दिवस उन्हात वाळवल्यानंतर, विटा अधिक मजबूत करण्यासाठी भट्टीमध्ये उच्च तापमानात (सुमारे 875 ते 900 डिग्री सेल्सिअस) बेक केल्या म्हणजे भाजल्या जातात.
'या' कारणामुळे विटांचा रंग लाल असतो
लोह आणि इतर धातूंमध्ये इतक्या उच्च तापमानावर प्रतिक्रिया होते. लोह आणि इतर धातूंचे ऑक्साइड अॅल्युमिना सिलिकासोबत मिळून लोह ऑक्साईड तयार होतो. या लोह ऑक्साईडमुळे विटांना लाल रंग येतो. याच कारणामुळे विटांचा रंग लाल असतो.
भाजल्यानंतर विटांचा आकार बदलतो
उच्च तापमानावर भट्टीत भाजल्यानंतर विटांचा आकार बदलतो. मातीपासून साच्याच्या साहाय्याने जी वीट बनवली जाते, ती भट्टीत बेक केल्यानंतर मूळ कच्च्या विटेपेक्षा आकाराने 10 टक्के लहान होते. म्हणजे भट्टीत उष्णता मिळाल्यानंतर या विटांचा आकार कमी होतो. एवढेच नाही तर भट्टीत भाजल्यानंतर या विटा खूप घट्ट होतात. त्यामुळे या पक्क्या भाजलेल्या विटा घरे आणि इमारती बनवण्यासाठी वापरल्या जातात. भट्टीत भाजलेल्या या विटा खूप मजबूत असतात. या विटा शतकानुशतके तुमचं घर मजबूत आणि सुरक्षित ठेवतात.