Trending News : निष्काळजीपणे ड्रायव्हिंग (Bus Accident Video Viral) केल्यामुळे जगभरात रस्ते अपघात होत असल्याच्या बातम्या आपण नेहमी पाहतो. नुकताच तामिळनाडू (Tamilnadu) राज्यातून एक धडकी भरविणारा व्हिडीओ समोर आला आहे, ज्याने सर्वांना हादरवून सोडले आहे. असं काय आहे या व्हिडिओमध्ये?
बसचालकची हवेत उडी, 30 लोक जखमी
तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात दोन खासगी बसमध्ये मोठी धडक झाल्याचे सांगण्यात येत आहे. समोरासमोर झालेली ही धडक इतकी भीषण होती की, बसचा चालक हवेत उडी मारताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना मंगळवार 17 मे रोजी घडल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये सुमारे 30 लोक जखमी झाले आहेत.
अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, एडप्पाडी-शंकरी महामार्गावरील कोळीपणई बसस्थानकाजवळ या दोन्ही बसची धडक झाली. त्यापैकी एक खाजगी बस 55 विद्यार्थ्यांना घेऊन थिरुचेनगोडहून निघाली होती, तर दुसरी बस 30 प्रवाशांसह इडापड्डीहून तिरुचेनगोडच्या दिशेने निघाली होती. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, अपघातावेळी बसमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेजमध्ये घटना कैद झाली आहे.
रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने धावली बस
रात्रीच्या वेळी चालक भरधाव वेगाने बस चालवत असल्याचे या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसपासून त्याला अंतराचा अंदाज आला नाही, तर रस्त्याच्या मधोमध बस चालवत असल्याने हा अपघात झाला. व्हिडिओमध्ये टक्कर झाल्यानंतर चालक हवेत उडी मारून समोरून पडताना दिसत आहे.
हेही वाचा :