VIDEO: असा नागिन डान्स तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
Viral Video: एका व्यक्तीने इतक्या जोशात डान्स केला आहे की तो पाहून यापुढे तुम्हाला नागिन डान्स देखील फिका वाटेल. या व्यक्तीचा हा मजेशीर डान्स पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
Viral Video: लग्नाआधी हळदीचा कार्यक्रम असो, लग्नाची वरात असो किंवा एखाद्याची बर्थडे पार्टी... अशा कार्यक्रमांमध्ये काहीजण बेभान होऊन नाचतात. अनेकांना नाचण्याची (Dance) खूप आवड असते आणि यासाठी ते फक्त एखाद्या कार्यक्रमाची वाट पाहत असतात. प्रत्येकाची स्वतःची अशी वेगळी नृत्यशैली असते. प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे नाचतो. काही जण प्रो डान्सर असतात, तर काही केवळ वरातीत करतात तसा नागिन डान्स (Nagin Dance) करणारे.
आता सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एका पठ्ठ्याने नागिन डान्सलाही मागे टाकत भन्नाट असा डान्स केला आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओतील व्यक्ती फार जोशात नाचताना दिसत आहे. गाणं गाणाऱ्या व्यक्तीसमोर उभं राहून ही व्यक्ती बेभान झाली आहे.
भान हरपून केला भन्नाट डान्स
व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका कार्यक्रमातील असल्याचं दिसून येतं, जिथे एक गायक गाणं गाण्यासाठी आला होता. इतक्यात गायक गाणं म्हणत असताना एक मुलगा नाचण्यासाठी त्याच्या जवळ गेला. आता या व्यक्तीने असा डान्स केला की त्याला पाहून गाणं म्हणणारा देखील थिरकायला लागला. गाणारा देखील गात गात त्या व्यक्तीसोबत नाचायला लागला. संपूर्ण शरीर वाकडं तिकडं करत हा तरुण बेभान होऊन नाचला. सोशल मीडियावर अनेकजण या व्यक्तीच्या शरीराच्या लवचिकतेचं कौतुक करत आहेत.
मागे पडून पडून नाचतोय हा व्यक्ती
व्हिडीओमध्ये नाचणाऱ्या या व्यक्तीला पाहून तुम्हाला सारखं असं वाटेल की आता हा व्यक्ती कुठेतरी पडेल किंवा त्याला दुखापत होईल. कारण ती व्यक्ती पूर्णपणे मागे झुकून नाचत होती. या माणसाची डान्स स्टाईल लोकांना खूप आवडली. त्या माणसाच्या डान्सकडे अजिबात लक्ष न देणाऱ्या त्याच्या शेजारी बसलेल्या काकींचंही काही लोकांनी कौतुक केलं. नाचताना तो माणूस इतका खाली वाकला की एका काकीला त्याला उठवण्यासाठी त्याच्या पाठीवर हात ठेवावा लागला.
View this post on Instagram
यूजर्सनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी खूप मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने म्हटलं की, 'मला अजूनही समजू शकलं नाही की यात सर्वात मजेदार कोण आहे. ही महिला, गायक की नाचणारा व्यक्ती? मला वाटतं की तिन्ही एक कम्प्लिट पॅकेज आहेत.' तर दुसरा एकजण म्हणाला, 'भाऊ गुरुत्वाकर्षणाचा चांगला वापर करत आहे.' 'भावाची लवचिकता जबरदस्त आहे', असंही एका यूजरने म्हटलं.
हेही वाचा:
VIDEO: दारूच्या नशेत गळ्यात गुंडाळला जिवंत अजगर; पेट्रोल पंपावर येऊन म्हणतो "माझा फोटो काढा ना!"