(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : ‘आग लगा दी....’; स्वत:ला आग लावून मॉडेलनं केला रॅम्प वॉक, व्हिडीओ पाहून तुम्हालाही फुटेल घाम
Viral Video : एका मॉडेलनं चक्क स्वत:ला आग लावून मॉडेलनं रॅम्प वॉक केला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Fire Ramp Walk Viral Video : जगभरातील फॅशन डिझायनर्स आपल्या अनोख्या फॅशन आणि डिझाइन्सने लोकांचं लक्ष वेधून घेताना दिसून येतं. अनेक वेळा वेगवेगळे फॅशन ट्रेंड्स सोशल मीडियावर व्हायरल होतात. जगभरात अनेक ठिकाणी प्रत्येक कानाकोपऱ्यात फॅशन वीकमध्ये निरनिराळे फॅशन डिझायन्स समोर येतात. काही प्रसिद्ध ब्रँडसचे कपडे आणि डिझाईन्स कायम चर्चेत असतात तर, कधी मॉडल्सही चर्चेत येतात.
Ramp Walk Viral Video : स्वत:ला आग लावून मॉडेलनं केला रॅम्प वॉक
फॅशन जगतात दररोज नवनवीन प्रयोग केले जातात. अलिकडच्या काळात प्रसिद्ध मॉडेल बेला हदीद (Bella Hadid) चा स्प्रे पेंटचा ड्रेस व्हायरल झाला होता. याच्या व्हिडीओ आणि फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढला होता. आता एक मॉडेलने चक्क स्वत:ला आग लावून मॉडेलनं रॅम्प वॉक केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Ramp Walk Viral Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही फुटेल घाम
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये फॅशन डिझायनरचे डिझाइन आणि कपडे पाहून यूजर्सही चकित झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मॉडेल रॅम्पवर चालताना दिसत आहे. यादरम्यान त्याच्या कपड्यांवरील आगीचे लोळ पाहून प्रत्येकाला घाम सुटला आहे. सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत.
Model's Firey Ramp Walk Video : पाहा व्हायरल व्हिडीओ
View this post on Instagram
रॅम्पवॉक करण्यापूर्वी कपड्यांना लावली आग
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ पॅरिस फॅशन वीक विंटर 2023 मधील असल्याचं सांगण्यात येत आहे. पॅरिस फॅशन वीकमधील रॅम्पवॉकचा व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आहेत. हेलियट एमिल नावाच्या फॅशन ब्रँडसाठी रॅम्पवर चालणाऱ्या मॉडेलने कपड्यांना आग लावून रॅम्प वॉक केला. व्हिडीओमध्ये मॉडेल डोक्यापासून पायापर्यंत जाड कापडाने झाकलेला दिसत आहे. मॉडेलने काळ्या कलरचे कपडे घातले आहेत. मॉडेल टोपी आणि हुडी परिधान करून हातात पर्स घेऊन रॅम्प वॉक करताना दिसत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :