(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : जंगलातील आग विझवताना कोसळले विमान, कशी घडली घटना? सोशल मीडियावर वेगाने व्हायरल
Airplane Crash Viral Video : व्हायरल व्हिडीओमध्ये एक विमान क्रॅश होताना दिसत आहे, ज्यामुळे यूजर्सना धक्का बसला आहे.
Airplane Crash Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, काही व्हिडीओ पाहून यूजर्स आश्चर्यचकित होतात. अलीकडेच, असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक विमान क्रॅश होताना दिसत आहे, ज्यामुळे यूजर्सना धक्का बसला आहे. या घटनेचे आश्चर्स सोशल मीडीयावर व्यक्त करण्यात येत आहे.
View this post on Instagram
दोन पायलटचा मृत्यू
माहितीनुसार, ही घटना 27 ऑक्टोबर रोजी घडली, इटलीच्या कॅटानियाजवळ एटना ज्वालामुखीच्या उतारावर एक विमान खाली पडताना दिसले, ज्यानंतर जोरदार स्फोट झाला, मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात विमानातील दोन पायलटचा मृत्यू झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आग विझवण्यासाठी गेलेले विमान मृत्यूच्या विळख्यात
एटना ज्वालामुखीच्या उतारावर लागलेली आग विझवण्यासाठी विमानाने उड्डाण घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी गेलेले विमान मृत्यूच्या विळख्यात सापडले आहे. यादरम्यान, विमानाने आगीवर वॉटर कॅनन टाकताच पायलटचा विमानासह तोल गेला आणि त्याचे विमान कोसळले. यानंतर वैमानिकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथक तैनात करण्यात आले.
व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळेच थक्क
सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर नावाच्या इंस्टाग्राम पेजवर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. जो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळेच थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओला दोन लाख 5 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे.
संबंधित बातम्या
लग्नाच्या दिवशी वधूने अचानक दिला बाळाला जन्म, हॉस्पिटलमध्ये करावं लागलं लग्न