Viral Video : शालेय जीवन म्हटलं की मित्र-मैत्रिणींसोबतचे वाद आले, त्यात लुटूपुटूची मारामारीही कधी होते. मात्र, या गोष्टी सहसा मुलांमध्ये घडतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क मुली एकमेकींशी मारामारी करताना दिसत आहेत. शाळेचा गणवेश परिधान केलेल्या या मुली भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी करताना दिसत आहेत. नेटकरी देखील या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.


शाळकरी मुलांची भांडणं, त्यातही त्या मुली आणि भर रस्त्यात सुरु असणारी त्यांची ही हाणामारी पाहून लोकही गोंधळून गेले आहेत. या मुलींनी एकाच प्रकारचे गणवेश परिधान केले असल्याने, त्या सगळ्या एकाच शाळेत शिकत असाव्यात, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, या मुली नेमक्या कोणत्या कारणावरून इतकी भयंकर हाणामारी करत असाव्यात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.   


पाहा व्हिडीओ :



सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही शाळकरी मुली आपापसात भांडताना दिसत आहेत. यादरम्यान सगळ्या मुलींनीही एकाच शाळेचा हिरव्या रंगाचा गणवेश परिधान केला आहे. भांडण सुरु असतानाच या मुली एकमेकींशी हाणामारी करू लागतात. यातील मुली चक्क एकमेकींचे केस आणि कपडे ओढून मारमारी करत आहेत. तर, काही मुलींच्या हातात काठी आहे, ज्याने त्या इतर मुलींना मारत आहेत. त्याचबरोबर काही मुलींमध्ये लाथा-बुक्क्याचेही प्रकार सुरू आहेत. दरम्यान, या भांडणामध्ये जाऊन काही मुलंही या मुलींची भांडणं थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.


नेटकरीही गोंधळले!


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा व्हिडीओत मुलींना अशाप्रकारे हाणामारी करताना पाहून अनेक लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, या मुलींच्या गटामध्ये मारामारी का झाली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच, ही घटना कुठे घडली हे देखील समजू शकलेले नाही. सोशल मीडियावर चर्चेत आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 1.35 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यासोबतच लोक वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडीओवर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.


हेही वाचा :