Monkey With Mobile Phone : सोशल मीडियावर लहान मुलांचे आणि प्राण्याचे व्हिडीओ अधिक व्हायरल होताना पाहायला मिळतात. या व्हिडीओंमुळे नेटकऱ्यांचं चांगलच मनोरंजन होतं. या व्हिडीओंवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देताना दिसतात. अनेक वेळा काही भन्नाट व्हिडीओ समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माकड (Monkey) आणि चिमुकली दिसत आहे.


मोबाईल फोन सध्याच्या आधुनिक जीवनाचा जणू एक अविभाज्य भागच बनला आहे. मोठ्यांप्रमाणे लहान मुलंही मोबाईल फोन वापरताना दिसतात. मात्र आता प्राण्यांनाही मोबाईल वापरण्याचा मोह आवरता आलेला नाही, असं म्हणावं लागेल. कारण या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक चिमुकली आणि एका माकडामध्ये मोबाईल फोनसाठी झटापट झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हांलाही हसू आवरणं कठीण होईल.


व्हायरल व्हिडीओ







मोबाइल फोनसाठी दोघांमध्ये भांडण


सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये लहान मुलगी आणि माकड खॉटवर एकत्र बसलेले दिसत आहे. लहान मुलीच्या हातात मोबाईल फोन आहे. तेथे एक माकड येतो. माकड मुलीच्या हातातील फोन हिसकावून घेतो आणि फोनकडे पाहू लागतो. यानंतर मुलीलाही राग येतो. मुलगीही माकडाकडून फोन हिसकावून घेते.


चिमुरडी आणि माकड यांच्यातील फोनवरून होणारी ही झुंज इथेच थांबत नाही. पुन्हा एकदा माकडाला राग येतो आणि तो मुलीकडचा फोन हिसकावून घेतो. कोणीतरी मुलगी आणि माकड यांच्यातील हे भांडण फोनवर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. इंस्टाग्रामवर babies_town नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला 12 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर लोक भरभरून कमेंट्स करत ​​आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या