Baby Elephant Cute Video : लहान मुलं माणसांची असो वा प्राण्यांची त्यांचा गोड, निरागस अंदाज काहीसा निराळाच असतो. त्यांचा खोडकर अंदाज साऱ्यांनाच भूल पाडतो. अनेक वेळा असे प्राण्यांच्या पिल्लांचे क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. त्यांचा गोंडस, खोडकर अंदाज नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतो.


सध्या असाच एक गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हत्तीच्या पिल्लाचा एक क्यूट व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यामधील हत्तीच्या पिल्लाचा पाणी पिण्याचा अंदाज सध्या चर्चेत आहे. हे पिल्लू पाणी पिण्याऐवजी त्या पाण्यात खेळताना पाहायला मिळत आहे.


हा व्हिडीओ 'फोर्ट वर्थ जू' (Fort worth zoo) या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीचं पिल्लू टँकमधील पाणी पिताना दिसत आहे. मात्र पाणी पिताना त्याला पाण्यात खेळण्याचा मोह आवरता आलेला नाही. त्यानंतर हे पिल्लू पाण्यात सोंड आपटत पाण्याचे शिंतोडे उडवताना दिसत आहे.






व्हिडीओला मिळाले लाखो व्ह्यूज
या व्हिडीओला आठ हजारांहून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. 29 एप्रिल रोजी पोस्ट केल्यापासून आतापर्यंत व्हिडीओला 1.29 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.


प्राणीसंग्रहालयाच्या अकाऊंटचे हजारो फॉलोअर्स
फोर्ट वर्थ प्राणीसंग्रहालय अमेरिकेतील टेक्सासमध्ये आहे. या प्राणीसंग्रहालयाच्या इंस्टाग्राम अकाउंटचे 99 हजार फॉलोअर्स आहेत. या प्राणिसंग्रहालयात सात हजारांहून अधिक प्राणी आहेत. प्राणीसंग्रहालय आपल्या इंस्टाग्राम पेजवरून विविध प्राण्यांच्या प्रजातींचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या