5 Month Old Child Workout Video : आजकालची मुलं फारच मस्तीखोर असतात. लहान मुलांमध्ये जास्त एनर्जी असते. मुलं दिवसभर घरातून इकडून-तिकडे उड्या मारताना पाहायला मिळतात. दिवसभर त्यांच्या मागून पळताना आई-वडील जरी थकले तरी त्यांची एनर्जी काही कमी होत नाही. अनेक वेळा ही मुलं मोठ्यांचं अनुकरण म्हणजेच त्यांना कॉपी करताना दिसतात. त्यांनी काहीही नवीन शिकायला अधिक वेळ लागत नाही. त्यांनी जे दिसेल ते करायचा ते प्रयत्न करतात. 


घरात खेळीमेळीचं वातावरण ठेवलं तर मुलं आपसुकच नवनवीन गोष्टी शिकतात. सध्या असाच एका पाच महिन्याच्या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे हा चिमुकला चक्क त्याच्या आईसोबत वर्कआऊट करतान दिसत आहे. तुम्हांलाही यावर विश्वास बसणार नाही. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हांला हे कळेल. 


या व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की एक महिला व्यायाम करत आहे आणि तिच्या शेजारी तिचा लहान मुलगा तिची कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडीओमध्ये मुलाचे वय पाच महिने असल्याचं सांगितलं जात आहे. या वयात मुलांना शरीराचा समतोलही नीट जमत नाही, पण या व्हिडीओमध्ये या मुलाचं संतुलन कौतुकास्पद आहे. पाच महिन्यांच्या बाळाला अशाप्रकारे व्यायाम करताना पाहण्याची ही पहिलीच वेळ असेल. 


तुम्हीही पाहा हा व्हिडीओ :







आतापर्यंत व्हिडीओला तीन मिलियनहून अधिक व्ह्यूज 
हा भन्नाट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर fitstagram.michelle नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ तीन मिलियन म्हणजेच 34 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर 30 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. मुलाच्या या अप्रतिम वर्कआऊटवर लोक विविध प्रकारच्या कमेंट्स करत ​​आहेत. 


इतर बातम्या