Trending News : जगात अनोक लोक विश्वविक्रम करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतात. जगभरात रोज नवनवीन विक्रम बनवले आणि मोडले जातात. अनेक लोक प्रसिद्धीसाठी विक्रम करतात. तर काही जण आवड म्हणून विक्रम करतात. यामध्ये कधी कधी विचित्र विक्रमही केले जातात. तर काही विक्रम खरोखरचं भन्नाट आणि कौतुकास्पद असतात. याच अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता. असाच एक विक्रम एका 103 वर्षीय आजींनी केला आहे. त्यांचा हा विक्रम तरुणाईलाही लाजवणारा आहे.


स्वीडननमधील 103 वर्षीय महिलेनं पॅराशूटने उडी मारत नवा विक्रम केला आहे. या स्वीडीश महिलेचं नाव रुट लार्सन (Rut Larsson) असं असून त्यांचं वय 103 वर्ष 259 आहे. रुट लार्सन यांनी पॅराशूट जंप करत (Tandem Parachute Jump) हा विक्रम केला आहे. पॅराशूटमधून उडी मारणारी ही सर्वात वयस्कर महिला (Oldest Lady) ठरली आहे. 






लार्सनने स्वीडनमधील मोताला येथे 29 मे रोजी पॅराशूटिस्ट जोकिम जोहानसनसोबत पॅराशूट जंप केली. लार्सन पॅराशूटमधून खाली येत असताना त्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य जमिनीवर तिची वाट पाहत होते. लार्सनच्या पॅराशूट जंपचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मंगळवारी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने लार्सनच्या पॅराशूट जंपचा व्हिडीओही शेअर केला आहे.