Trending News : सध्या उन्हाळा ऋतू सुरू झाल्याने उन्हाचा पाराही तितक्याच झपाट्याने वाढताना दिसत आहे. माणसांसोबतच वन्य प्राण्यांनाही याचा फटका बसताना दिसत आहे. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे, ज्यामध्ये एका पोलीस हवालदाराच्या कृत्याचे कौतुक केले जात आहे. असे काय केले पोलीस हवालदाराने?


पोलीस हवालदाराची अशीही भूतदया..


कोरोना महामारीच्या वेळी लॉकडाऊन दरम्यान अनेक लोकांचे व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसले, ज्यामध्ये लोक प्राण्यांना मदत करण्यासाठी त्यांना पाणी देताना दिसत होते. नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोलीस हवालदार कडक उन्हाने त्रस्त तसेच तहानेने व्याकूळ असलेल्या माकडाचा जीव वाचवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकतो, जंगलातून जात असताना पोलीस हवालदारासमोर तहानलेले माकड येते. त्यानंतर हवालदारा देखील या माकडाच्या मदतीसाठी धावत येत आपल्या पाण्याच्या बाटलीतून माकडाला पाणी पाजले.


'शक्य असेल तिथे दयाळू व्हा आणि मदत करा"


व्हायरल होत असलेली व्हिडिओ क्लिप IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केली आहे, ती शेअर करण्याबरोबरच त्यांनी त्यांच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'शक्य असेल तिथे दयाळू व्हा आणि मदत करा. कॉन्स्टेबल संजय घुडे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकली आहेत.






सोशल मीडियावर जिंकली सर्वांची मने 


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या क्लिपला आतापर्यंत 10 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी, 1300 हून अधिक युझर्सनी याला लाईक केले आहे. तसेच अनेक युझर्सनी माकडाला पाणी देणाऱ्या पोलीस हवालदाराचे कौतुक करताना दिसतात. एका यूजरने त्याला सलाम केला तर अनेक यूझर्स त्याच्या कामाचे कौतुक करताना दिसत आहेत.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha