Viral Video : महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते वेळोवेळी अनेक जुगाडू व्हिडिओ शेअर करताना दिसतात. जे पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. नुकताच त्यांनी असाच एक देसी जुगाडचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात लहान मुलाची जुगाड टेक्नॉलॉजी पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.


या व्हिडीओमध्ये एका लहान मुलगा लाकडी चौकटीत तार बांधताना दिसत आहे. ज्याच्या मदतीने तो काही मिनिटांतच दोन मोठे मासे पकडतो. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.


पाहा हा व्हिडीओ : 


 






 


व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये लहान मुलगा सर्वात आधी तलावाच्या काठावर एक लाकडी चौकट रचत असल्याचे दिसत आहे. यानंतर, तो माशांना आमिष दाखविण्यासाठी खाद्यपदार्थ तारेला गुंडाळतो आणि पाण्यात सोडून देतो. त्याने ते खाद्य पाण्यात सोडताच काही मिनिटांतच दोन मोठे मासे जाळ्यात अडकतात. आणि अशा प्रकारे हा लहान मुलगा अवघ्या काही मिनिटांतच मासेमारी करताना दिसत आहे.   


हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ जवळपास 12 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलेला आहे. तर 80 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण प्रभावित होत आहेत आणि या लहानग्याच्या कामगिरीचे प्रचंड कौतुक देखील करत आहेत.     


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha