Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) अनेक इमोशनल आणि मोटिव्हेशनल व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. बर्थ-डे सरप्राइजच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील एका आजोबांच्या भावना पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत.
व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 85 वर्षाच्या आजोबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सरप्राइज देण्यात आलं. त्यांना केक देऊन सरप्राइज देण्यात आल्यानंतर त्यांची रिअॅक्शन या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला असून या व्हिडीओला आता पर्यंत एक लाख साठ हजार युजरनं लाइक केलं आहे. अनेकांनी या व्हिडीओला कमेंट करून आजोबांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एका नेटकऱ्यानं या व्हिडीओला कमेंट करून त्या आजोबांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि इमोशनल इमोजी शेअर केले. goodnews movement या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- Lock Upp : कंगनाच्या लॉकअपमध्ये आपापसांतचं भिडली ‘टीम ब्लू’, पूनम पांडेशी वादानंतर अंजली अरोराची टास्कमधून माघार!
- Bhagya Dile Tu Mala : नवी मालिका अन् नवी भूमिका, ‘रत्नमाला’ स्वीकारण्याबद्दल निवेदिता सराफ म्हणतात...
- The Kashmir Files : ज्यांना 'द कश्मीर फाइल्स'ची अडचण आहे, त्यांनी स्वतःचा चित्रपट बनवून सत्य दाखवावे : अनुपम खेर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha