Trending News : लहान मुलांना त्यांच्या पालकांकडून खेळण्यासाठी अनेक प्रकारची खेळणी दिली जातात. ती पाहून ही लहान मुलं खूप आनंदी होताना दिसतात. काही मुलांना बाहुल्यांसोबत खेळायला आवडते, तर काही मुलांना हाय-टेक रिमोट कंट्रोल सिस्टीम असलेल्या खेळण्यांसोबत खेळायला आवडते. अशातच एक व्हिडिओ सध्या सर्वांना आश्चर्यचकित करताना दिसत आहे, ज्यामध्ये एका लहान मुलीचे हावभाव सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे.


चिमुरडीला अनोखं भेट देणारी एक आई खूप चर्चेत
सहसा, मुलांचे पालक त्यांना आनंदी ठेवण्यासाठी अनेक भेटवस्तू आणि खेळणी देतात. पण याही पलीकडे आपल्या चिमुरडीला अनोखं भेट देणारी एक आई खूप चर्चेत आहे, ती आपल्या मुलीला एक भीतीदायक गिफ्ट देताना दिसत आहे. ते गिफ्ट पाहून त्यांची मुलगी इतर मुलांपेक्षा वेगळी वागताना दिसते. आईने दिलेली हॉन्टेड बाहुली दिसल्यावर मुलगी अजिबात घाबरली नाही. उलट तिचे हावभाव पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.


 




 


ते गिफ्ट पाहून मुलगी खूप आनंदी होते...पण..
व्हायरल होत असलेली क्लिप ब्रिटीकिटी नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये एक आई पहिल्यांदा कॅमेऱ्यात एक हॉन्टेड बाहुली दाखवताना दिसत आहे. त्यानंतर ती तिच्या मुलीला गिफ्ट करते जिचे नाव लिली आहे. ते गिफ्ट पाहून तिची मुलगी खूप आनंदी होते आणि म्हणते की तिला हे गिफ्ट खूप आवडले आहे.


व्हिडीओ पाहून युजर्स आश्चर्यचकित


लिली तिच्या आईला सांगते की तिला डॉलचे डोळे खूप गोंडस वाटतात. त्यानंतर ती त्याच्यासोबत खेळू लागते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आल्यानंतर युजर्स आश्चर्यचकित होताना दिसत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 1.5 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर प्रत्येकजण या मुलीला भरभरून प्रेम देताना दिसत आहे.


हेही वाचा :