Trending News : पुराच्या (Flood) वेळी सेल्फी स्टिक (Selfie Stick)  घेऊन धावणाऱ्या महिलेचा एक जुना व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सर्वत्र पूर आला असूनही, महिला सेल्फी स्टिकवर त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहे.


 


 






...आणि ती पूर्णपणे पाण्याखाली गेली
हे पाणी आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते याची या महिलेला जराही कल्पना नव्हती, तरीही तिने फोनवर व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. व्हिडिओमध्ये एक वेळ अशी आली की, पुराचे पाणी अचानक जास्त अंगावर आले आणि ती पूर्णपणे पाण्याखाली गेली, तरीही ती घाबरली नाही.


4 लाखांहून अधिक व्ह्यूज 
हा व्हिडिओ फिगेनने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओला 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "पुरामध्ये सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे सेल्फी स्टिक घेणे!" कॅप्शन वाचून हे स्पष्ट होते की व्हिडिओ शेअर करणाऱ्या ट्विटर युजरने महिलेच्या या कृत्याची खिल्ली उडवली आहे. तसेच हा व्हिडिओ पुराच्या वेळी रेकॉर्ड केलेला होता तर काही युझर्सनी माहिती दिली की ही बोनो लाट आहे, जी इंडोनेशियामध्ये आहे आणि ही एक नैसर्गिक घटना आहे जी कांपर नदीमध्ये उद्भवते. जेव्हा भरतीचे प्रवाह नदीच्या प्रवाहांना मिळतात, तेव्हा नदीत प्रचंड लाटा निर्माण होतात.


हेही वाचा: