Trending News : सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक पाकिस्तानी पत्रकार कॅमेऱ्यासमोर एका मुलाला कानाखाली मारताना दिसत आहे. या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ निर्माण केली आहे.
महिला पत्रकाराने एका मुलाला जोरदार कानाखाली मारली
अलीकडेच ईदच्या दिवशी वार्तांकन करणाऱ्या एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने एका मुलाला जोरदार कानाखाली मारली होती. ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ 3 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला रिपोर्टर दिसत आहे. बोलता बोलता ती अचानक थांबते आणि शेजारी उभ्या असलेल्या मुलाला कानाखाली मारते.
पाकिस्तानी रिपोर्टर कशामुळे चिडली?
पाकिस्तानी रिपोर्टर कशामुळे चिडली हे माहित नसले तरी तिने रिपोर्टिंग संपवताच शेजारी उभ्या असलेल्या मुलावर हात सोडला. असे म्हटले जाते की, त्या मुलाने काही अनुचित टिप्पणी केली होती, ज्यामुळे रिपोर्टर भडकली.
युझर्स गोंधळात
इंटरनेटवरील नेटकरी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरोखरच गोंधळून गेले, कारण त्यांना समजू शकले नाही की पत्रकाराने असे का केले? तर इतर अनेक युझर्स या महिला पत्रकाराच्या हिंसक वर्तनाच्या विरोधात होते.
महिला पत्रकारांसमोर मोठे आव्हान
हे खरे आहे की फिल्ड रिपोर्टिंग करताना रिपोर्टरला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते आणि विशेषत: महिला पत्रकारांसमोर ते मोठे आव्हान असते. कारण काहीही असो, हिंसक असणे हे कोणत्याही समस्येचे समाधान असू शकत नाही. एखाद्या पाकिस्तानी महिला पत्रकाराची अडचण असली तरी ती आधी समजावून सांगून सोडवता आली असती. असे युझर्सचे म्हणणे आहे.
हेही वाचा: