Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) लोक वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. सोशल मीडियावरील काही पोस्टचं नेटकरी कौतुक करतात तर काही लोक हे पोस्टला ट्रोल करतात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती गाणं गाताना दिसत आहे. या व्यक्तीच्या गाण्याला अनेकांनी ट्रोल केलं आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हा 1964 साली रिलीज झालेल्या मिस्टर एक्स इन बॅम्बे या चित्रपटातील ‘मेरे महबूब कयामत होगी’ हे गाणं गाताना दिसत आहे. या व्यक्तीच्या गाण्याला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. या व्हिडीओवर 'ये क्या था भाई' असं लिहिलेलं दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमधील व्यक्तीच्या हातात ढोलकी दिसत आहे. ढोलकी वाजवता-वाजवता हा व्यक्ती गाणं देखील गातो. गाण्याची सुरुवात करताना हा व्यक्ती 'समन' शब्द म्हणण्याऐवजी स्लम असं म्हणतो. त्यानंतर तो ‘मेरे महबूब कयामत होगी’ हे गाणं गायला सुरुवात करतो. गाणं गात असतानाच तो मध्येच रॅप देखील म्हणतो. या व्यक्तीच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये या व्यक्तीच्या जवळ उभी राहिलेली लहान मुलं गाण्यावर थिरकाताना दिसत आहेत. आत्तापर्यंत जवळपास 4.3 मिलियन व्हुज या व्हिडीओ मिळाले आहेत. तर 4 लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे.
पाहा व्हिडीओ
नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
या व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका व्यक्तीनं कमेंटमध्ये लिहिलं, 'हे गाणं ऐकलं तर माझ्या कानातून रक्त येईल' तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'लो बजेट रिमिक्स'. 'ब्रेक-अप नंतर माझा मित्र देखील असंच करेल' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली आहे. 'हा टोनी कक्करपेक्षा चांगलं गात आहे', अशी कमेंट देखील एका युझरनं केली.
हेही वाचा: