Indore Trending Video : फालुदा खायला सर्वांना आवडतो. उन्हाळ्यामध्ये अनेक लोक गार गार फालुदा खातात. मध्यप्रदेशमधील इंदूर (Indore) येथील एक फालुदा विक्रेता हा चक्क दोन किलो सोनं घालून एका स्टॉलवर फालुदा विकतो. या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मध्यप्रदेशातील इंदूर येथील सराफा बाजारमध्ये 'गोल्डनमॅन' अशी ओळख असणारे नटवर नेमा हे रबडी फालुदा विकतात. सराफा बाजारमध्ये दिवसभर सोन्याची आणि चांदीची दुकानं सुरु आसतात. रात्री ही दुकानं बंद झाली की येथे वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल लावले जातात. यामधील रबडी फालुदाचा स्टॉल हा नटवर नेमा यांचा आहे. नटवर नेमा हे कानात सोन्याचे कानातले, सोन्याची अंगठी, गोल्डन ब्रेसलेट घालून रबडी फालुदा विकतात. अनेक लोक त्यांनी तयार केलेला रबडी फालुदा खाल्यानंतर नटवर यांच्यासोबत सेल्फी काढतात. नटवर नेमा यांनी तयार केलेला फालुदा खाण्यासाठी लोक त्यांच्या स्टॉल जवळ गर्दी करतात.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
youtubeswadofficial या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नटवर यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे, 'इंदूरचे गोल्डनमॅन. दोन किलोचं सोनं खालून ते फालुदा विकतात.' अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी देखील नटवर नेमा यांनी तयार केलेला फालुदा खाण्यासाठी येतात.
पाहा व्हिडीओ:
नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
अनेक नेटकऱ्यांनी नटवर यांच्या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन त्यांचे कौतुक केले आहे. तर काहींनी या कमेंट करुन त्यांना ट्रोल देखील केले आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'त्यांच्याकडे सोन्याची ज्वेलरी घ्यायला पैसे आहेत, पण हातमोजे घालायला पैसे नाहीयेत.' दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'मी त्यांनी तयार केलेला फालुदा खाल्ला आहे. मला टेस्ट आवडली नाही'
हेही वाचा: