Facts: पृथ्वीवर जितक्या प्रकारचे देश (Country) आहेत, तितक्या प्रकारचे तेथील लोक (People) आणि तितक्या प्रकारची बोलण्याची स्टाईल आहे. अनेकदा असं घडतं की आपल्याला अशा काही गोष्टी ऐकायला आणि बघायला मिळतात, ज्या पचायला जड जातात आणि आपण त्यावर सहज विश्वास ठेवू शकत नाही. असाच एक प्रकार बेल्जियम (Belgium) देशातून समोर आला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, येथील एका बारमध्ये (Bar) लोकांना शूजऐवजी बिअर (Beer) दिली जाते. म्हणजेच तुम्ही तुमच्या घरून शूज घेऊन या आणि त्याऐवजी या बारमधून बिअर घेऊन जा.
कोणत्या प्रकारच्या शूजच्या बदल्यात मिळते बिअर?
जर तुम्ही असा विचार करत असाल की येथे तुम्हाला कोणत्याही स्थितील्या शूजऐवजी बिअर प्यायला मिळेल, तर तुम्ही चुकत आहात. वास्तविक, यावेळी नियम असा आहे की तुम्ही येथे जे कोणते शूज (Shoes) द्याल त्यांचे सोल, म्हणजेच तळवे चांगल्या स्थितीत असावेत. तसेच, फ्लिप-फ्लॉप (Flip-flop), स्लिपर (Slipper) किंवा सँडलऐवजी (Sandal) बिअर मिळावी, अशी तुमची इच्छा असेल तर ते होणार नाही. आता हे देखील जाणून घ्या की येथे शूजच्या बदल्यात बिअर मोफत मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतात. बिअर बारमध्ये शूज जमा करावे लागतात, जेणेकरून कोणी बारमधून त्यांचा काचेचा ग्लास चोरी करुन नेऊ नये.
बारवाल्यांना कशी सूचली ही कल्पना?
चोरीमुळे त्रस्त होऊन बार मालकाने हे कृत्य केलं आहे. एक काळ असा होता की, बेल्जियममधील बार मालक बारमधील वाढत्या ग्लासच्या चोरीमुळे चिंतेत होते. अशा स्थितीत त्यांना एक कल्पना सुचली, आता जो कोणी बारमध्ये बिअर प्यायला येईल, त्याचे शूज बारवाले जमा करुन घेतात आणि त्याशिवाय त्यांना बिअर देत नाहीत. ग्राहकांनी बिअर पिल्यानंतर ग्लास जमा केले कीच त्यांना त्यांचे शूज परत केले जातात. ज्यांना पैसे आणि ग्लास द्यायचे नसतील ते शूज देऊन बिअर आणि ग्लास घरी घेऊन जातात. मात्र, असे करणारे फार कमी लोक आहेत. बरेच लोक त्यांचे बूट परत घेतात आणि बिअरचे पैसे देऊन घरी निघून जातात.
हेही वाचा: