Alcohol Facts : दारुचे (Alcohol) अनेक शौकीन आहेत. अगदी जगभरात मद्यप्रेमींची संख्या फार मोठी आहे. भारतात बहुतेक लोक दारु गारेगार पाण्यासोबत, सोडा किंवा बर्फ टाकून पितात. साधारणपणे पाणी काही फ्रिजमध्ये ठेवलं तर ते गोठून त्याचा बर्फ होतो. इतर कोणतंही पेय तुम्ही काही वेळ फ्रीज किंवा फ्रिजरमध्ये ठेवलं तर त्याचाही बर्फ होतो. पण दारु फ्रिज किंवा डीप फ्रिजरमध्ये ठेवल्यावरही त्याचा बर्फ होत नाही, यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का?
फ्रीजमध्ये ठेवलेल्या दारूचा बर्फ का होत नाही?
प्रत्येक द्रवरूप पदार्थांचा गोठण बिंदू म्हणजेच फ्रिझिंग पॉइंट (Freezing Point) वेगवेगळा असतो. प्रत्येक द्रवरुप पदार्थाचं एका विशिष्ट तापमानावर बर्फात रुपांतर होतं. द्रवाचं बर्फामध्ये रुपांतर होणं हे विविध बाबींवर अवलंबून असतं. तुम्ही फ्रिजमध्ये दारु गोठवू शकत नाही, यामागे एक वैज्ञानिक कारण आहे, ते कोणतं जाणून घ्या...
द्रव पदार्थ कसे गोठतात?
प्रत्येक द्रवाची स्वतःची आंतरिक ऊर्जा असते, ही आसपासच्या वातावरणाच्या तापमानावर अवलंबून असते. जेव्हा सभोवतालचे तापमान कमी होते, तेव्हा ही ऊर्जा देखील कमी होऊ लागते. ही ऊर्जा शून्यावर पोहोचल्यावर त्यामधील रेणू एकमेकांना चिकटू लागतात. परिणामी, द्रवाचं घनरूपांत रुपांतर होतं म्हणजेच ते गोठतात.
दारु का गोठत नाही?
द्रव गोठणे ही क्रिया वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. अल्कोहोलमध्ये काही सेंद्रिय रेणू आढळतात, ज्यामुळे दारु गोठत नाही. द्रव गोठणं त्याच्या गोठणं बिंदूवर अवलंबून असतं. प्रत्येक पदार्थाचा गोठणबिंदू वेगळा असतो. गोठण बिंदू म्हणजे ज्या तापमानावर पदार्थ गोठण्यास सुरुवात होतं. पाणी 0 अंश सेल्सिअसवर गोठण्यास सुरुवात होते. म्हणूनच पाण्याचा गोठण बिंदू शून्य अंश सेल्सिअस आहे. त्याचप्रमाणे इतर द्रव आणि अल्कोहोलचा गोठण बिंदू वेगवेगळा असतो.
दारू कोणत्या तापमानावर गोठवता येते?
अल्कोहोलचा गोठण बिंदू -114 अंश सेंटीग्रेड आहे. त्यामुळे दारु गोठवण्यासाठी -114 अंश सेल्सिअमपेक्षा कमी तापमान लागेल. द्रवपदार्थांच्या गोठणबिंदूमधील फरक द्रवातील रेणूंवर अवलंबून असतो. पाण्याचे रेणू इथेनॉलच्या कोणत्याही रेणूपेक्षा अधिक घट्ट बांधलेले असतात. म्हणूनच त्याचा अतिशीत बिंदू देखील कमी आहे. याउलट दारुचा गोठण बिंदू जास्त आहे.
दारु गोठवता येते?
कोणत्याही घरगुती फ्रीजचं तापमान 0 ते -10 किंवा कमाल -30 अंश सेल्सिअस असते. यामध्ये पाणी सहज गोठतं, पण दारु गोठत नाही. असं कोणतंही रेफ्रिजरेटर नाही ज्यामध्ये -114 अंश सेल्सिअस इतकं कमी तापमान निर्माण केलं जाऊ शकतं. त्यामुळे असं कोणतंही घरगुती वापरातील फ्रीज नाही ज्यामध्ये दारु गोठवता येईल.