Viral News : अंडी (Eggs) खाणं अनेकांना आवडतं, पण तुम्ही कधी माणसाला अंडी (Egg) दिल्याचं ऐकलं आहे का? असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 14 वर्षांच्या मुलगा चक्क अंडी घालतो. इतकंच नाही तर, त्याच्या कुटुंबियांचाही दावा आहे की, तो दोन वर्षांपासून अंडी घालत आहे. काही वर्षांपूर्वी इंडोनेशियामध्ये हे धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. इंडोनेशियातील एका मुलगा कोंबडीप्रमाणे अंडी घालतो. त्याचं कुटुंबीय असंच सांगतात की, गेल्या 2 वर्षांत त्यांच्या मुलाने 20 अंडी घातली आहेत. हे ऐकणाऱ्या किंवा वाचणाऱ्या कुणालाही यावर विश्वास बसणार नाही. सध्या अंडी देणारा हा मुलगा सोशल मीडियावर चर्चेत आहे.
'हा' मुलगा देतो अंडी, पाहून डॉक्टरही चकित
माणूस अंडी कसा घालू शकतो हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल? पण एक मुलगा अचानक कोंबडीप्रमाणे अंडी देऊ लागला. 14 वर्षांचा इंडोनेशियन मुलगा अकमल याचा दावा आहे की, तो कोंबडीप्रमाणे अंडी घालतो. या कारणामुळे प्रकृती बिघडल्याने त्याला अनेकवेळा रुग्णालयात दाखल करावं लागलं. डेली मेलच्या वृत्तानुसार, अकमलची अंडी घालण्याची क्षमता पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले, कारण सामान्यतः मानवी शरीर अंडी बनण्यास अनुकूल नसते. विशेष म्हणजे डॉक्टरही यामागचं कारण शोधत आहेत.
इंडोनेशियातील अकमलने काही वर्षांपूर्वी पहिल्यांदा अंड दिलं. त्यानंतर दोन वर्षात त्याने सुमारे 20 अंडी दिली. अकमल अंड देताना पाहून त्याचे कुटुंबियही चकित झाले आणि त्यांनी मुलाला घऊन रुग्णालय गाठलं. त्यानंतर अकमलने रुग्णालयातही दोन अंडी दिली. हे पाहून डॉक्टरही चक्रावले. डॉक्टरांनी मुलाच्या शरीराचा एक्स-रे काढला. यामध्ये मुलाच्या शरीरात अंडी असल्याचं आढळून आलं, पण ही अंडी नक्की आली कुठून या प्रश्नाचं उत्तर डॉक्टरही शोधत आहेत.
नक्की का आहे प्रकरण?
इंडोनेशियातील दक्षिण सुलावेसी येथील रहिवासी असलेल्या अकमलला घेऊन त्याचे वडील सायक युसूफ हॉस्पिटलमध्ये पोहोचले. अकमल अंडी देतो हे ऐकून डॉक्टरही अवाक झाले, त्यांनाही यावर विश्वास बसेनासा झाला. डॉक्टरांनी त्याला निरीक्षणाखाली ठेवलं, तेव्हा त्याने हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसमोरच 2 अंडी दिली. डॉक्टरांनी ही अंडी तपासली असता ती मानवी शरीरातील कोंबडीची अंडी असल्याचे आढळून आलं.
अंडी आली कुठून?
मानव नैसर्गिकरित्या अंडी घालण्यास सक्षम नसल्यामुळे ही अंडी अकमलच्या शरीरात आली कशी हा प्रश्न आहे. मानवी शरीरात अंडी तयार होणे अशक्य आहे. 2016 पासून अंडी घालणाऱ्या या मुलाने डॉक्टरांसमोर 2 अंडी दिली आणि सर्वांना आश्चर्यचकित केलं.
लोकांना आली ही शंका
ही बातमी सोशल मीडियावर पसरताच लोक वेगवेगळ्या पद्धतीने यावर प्रतिक्रिया देऊ लागले. काही लोकाचं म्हणणं होतं की, अकमल आधी अंडी शरीरात ठेवायचा म्हणजेच तो गिळायचा आणि नंतर तो गुद्दद्वारेमार्फत बाहेर काढायचा. पण असं असलं तरी एवढा त्रास कोण कशासाठी सहन करेल, हाही प्रश्न उपस्थित करण्यात आला.
सोशल मीडियावर व्हायरल
ही बातमी जेव्हा पहिल्यांदा सर्वांसमोर आली तेव्हा या विश्वास बसणं फार कठीण होतं. 2018 साली ही बातमी खूप चर्चेत होती. आता पुन्हा ही बातमी इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे व्हायरल होत आहे.
संंबंधित इतर बातम्या :