Viral Video : मोबाईल चोरलात तर होईल फजिती! चालत्या ट्रेनमध्ये खिडकीला टांगलेला हा चोरटा होतोय व्हायरल
Viral Video : सध्या देशात चालत्या ट्रेनमधून मोबाईल चोरीच्या घटना अगदी सर्रास घडत आहेत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Viral Video : लॉकडाऊननंतर भारतात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. बिहारमध्ये (Bihar) तर गुन्हेगारीच्या बातम्या अगदी सामान्य झाल्या आहेत. नुकताच सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रेल्वे पूलवर वाऱ्याच्या वेगाने एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेत आहे. सध्या बिहारमधील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मोबाईल चोर ट्रेनला लटकताना दिसत आहे.
सध्या देशात चालत्या ट्रेनमधून मोबाईल चोरीच्या घटना अगदी सर्रास घडत आहेत. यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आल्याने केवळ लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या व्हिडीओमध्ये एक चोर ट्रेनच्या खिडकीला लटकताना दिसत आहे. या चोरट्याला प्रवाशांनी चोरी करताना पकडले होते. तो प्रवाशांना सतत त्याला सोडू नका अशी विनंती करताना दिसतो आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
View this post on Instagram
चोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. यूजर्स मात्र हा व्हिडीओ पाहून प्रचंड आनंद घेत आहेत. या व्हिडीओत हा चोर 'मला सोडू नका' अशी वारंवार विनंती करत आहे. आतापर्यंतच्या घडलेल्या घटनेत ही रदाचित पहिलीच घटना आहे. जिथे चोर स्वत: 'मला सोडू नका' अशी विनंती करतोय.
चोरी करण्याचा धडा शिकला
मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास समस्तीपूर-कटिहार पॅसेंजर ट्रेन साहेबपूर कमल-उमेशनगर दरम्यान जात होती. दरम्यान रेल्वेच्या खिडकीजवळ एक प्रवासी बसला होता. तो मोबाईलवर बोलत होता. ट्रेन सुरू होताच चोरट्याने प्रवाशाच्या मोबाईलवर झटापट केली. प्रवाशाने सतर्कता दाखवत त्या दुष्ट चोराचा हात पकडला.
बघणाऱ्यांची मजाच
व्हिडीओमध्ये चोर भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रेनमध्ये लटकताना दिसत आहे. त्याचा हात सोडू नका असे आवाहन तो लोकांना करतो. तर, सोशल मीडियावर मात्र, याला माफ केले तर तो टिकणार नाही. असे म्हणत यूजर्स मजा घेत आहेत. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या कमेंट्सदेखील या व्हिडीओला येत आहेत.
महत्वाच्या बातम्या :