एक्स्प्लोर

Country of Midnight Sun : 'या' देशात फक्त 40 मिनिटांसाठी मावळतो सूर्य, लगेच होते 'पहाट'; काय आहे यामागचं कारण?

Country of Midnight Sun : या देशात फक्त 40 मिनिटांसाठी रात्र होते. यामुळे नॉर्वेला 'कंट्री ऑफ मिडनाइट सन' असंही म्हणतात.

Norway Country of Midnight Sun : पृथ्वीवर (Earth) अजूनही अनेक रहस्य लपलेली आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. जगात अशाही काही गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला माहिती नाहीत आणि ते ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पृथ्वी सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालते, हे सर्वांनाच माहिती आहे. यामुळे संपूर्ण जगात दिवस आणि रात्रीची वेळ वेगवेगळी असते. जगभरात सर्व ठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ विभिन्न असते. 

सूर्य फक्त 40 मिनिटांसाठी मावळतो

भारतात पहाटे 6 वाजलेले असतात, तेव्हा अमेरिकेमध्ये रात्र असते. पण जगात असाही एक देश आहे, जिथे फक्त 40 मिनिटांची रात्र आहे. या देशात सूर्य फक्त 40 मिनिटांसाठी मावळतो आणि त्यानंतर लगेच पहाट होते आणि दुसरा दिवस उजाडतो. येथे रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास सूर्योदय होतो.    

'या' देशात फक्त 40 मिनिटांची रात्र

या देशाचं नाव आहे नॉर्वे. येथे फक्त 40 मिनिटांसाठी सूर्य मावळतो आणि लगेचच मध्यरात्री सूर्य उगवतो. म्हणूनच या देशाला 'कंट्री ऑफ मिडनाइट सन' (Country of Midnight Sun) असंही म्हणतात. नॉर्वे हा जगाच्या नकाशावर युरोप खंडाच्या उत्तरेला वसलेला देश आहे. हा देश उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे जगातील अनेक भागांच्या तुलनेत येथे अतिशय थंड हवामान आहे. 

रात्री 1:30 च्या सुमारास उगवतो

नॉर्वे आर्क्टिक ध्रुवीय प्रदेश आहे, त्यामुळे येथे एक विचित्र घटना घडते. नॉर्वेमध्ये मे महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत सुमारे 76 दिवस म्हणजेच अडीच महिने सूर्य फक्त 40 मिनिटांसाठी मावळतो. मात्र, ही परिस्थिती वर्षभर नसते. हे फक्त अडीच महिन्याच्या काळात होते. अडीच महिने नॉर्वेमध्ये रात्र फक्त 40 मिनिटांची असते. येथे रात्री ठीक 12:43 वाजता सूर्य मावळतो आणि त्यानंतर फक्त 40 मिनिटांनी म्हणजे रात्री 1:30 च्या सुमारास उगवतो.

नॉर्वे मध्यरात्री सूर्याचा देश म्हणतात

या घटनेमुळे नॉर्वे हा देश संपूर्ण जगभरात 'कंट्री ऑफ मिडनाईट सन' म्हणजेच मध्यरात्री सूर्याचा देश म्हणूनही ओळखला जातो. इतके दिवस कमी सूर्यप्रकाशामुळे येथील लोकांना फारशी उष्णता मिळत नाही. नॉर्वे हा देश उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ असल्यामुळे येथे खूप थंडी पडते. या देशात बर्फाने झाकलेले अनेक पर्वत तसेच अनेक हिमनद्या आहेत. नॉर्वे देशाचा मुख्य व्यवसाय पर्यटान आहे. पर्यटन व्यवसायावर येथील अर्थव्यवस्था पर्यटनातून येते, यामुळे नॉर्वेची गणना जगातील श्रीमंत देशांमध्ये केली जाते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Free Air Ticket : फ्रीमध्ये करा विदेश यात्रा, 'या' देशाची भन्नाट ऑफर, पाच लाख मोफत एअर तिकीट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharahtra Politics : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर
Wrestler Arrested: 'तो पूर्णतः निर्दोष आहे', आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू Sikandar Shaikh ला शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी जामीन
Chhattisgarh Train Accident: बिलासपूरमध्ये भीषण अपघात, लोकल-मालगाडीच्या धडकेत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
OBC Reservation: ओबीसी आरक्षणावरून श्रेयवाद, बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा
Maharashtra Civic Polls: महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या सुपरफास्ट बातम्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : संजय गायकवाड
निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : संजय गायकवाड
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
मोठी बातमी : 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल
मोठी बातमी : 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल
Embed widget