![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Viral Video : कोळ्याचा चक्क मोरासारखा पिसारा? हा रंगीबेरंगी पिसारा पाहून तुम्हीही थक्क व्हाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral Video : नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक छोटा कोळी दिसत आहे. जो मोराप्रमाणे रंगीबेरंगी पिसे पसरवत नाचताना दिसत आहे.
![Viral Video : कोळ्याचा चक्क मोरासारखा पिसारा? हा रंगीबेरंगी पिसारा पाहून तुम्हीही थक्क व्हाल, व्हिडीओ होतोय व्हायरल spider was seen dancing like a peacock spreading its colorful wings marathi news Viral Video : कोळ्याचा चक्क मोरासारखा पिसारा? हा रंगीबेरंगी पिसारा पाहून तुम्हीही थक्क व्हाल, व्हिडीओ होतोय व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/c30199725d628e1cd09455aadfd0a4741666622512313358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Spider Viral Video : सोशल मीडियावर कधी-कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यावर डोळ्यांवर विश्वास ठेवणे थोडे कठीण होऊन जाते. नुकताच असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जे पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. त्याचवेळी हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये एक कोळी दिसत आहे जो बाकीच्या कोळ्यांप्रमाणे खूपच लहान आहे. झाडाच्या सालावर चालताना, यूजर्सना एका खास कारणासाठी हा स्पायडर पाहायला आवडतो. व्हिडीओमध्ये कोळी रंगीबेरंगी पिसे डोक्यावर मोराप्रमाणे पसरवून नाचताना दिसत आहे.
मोरासारखा कोळीचा पिसारा?
सोशल मीडियावर समोर आलेला हा वाईल्ड अॅनिमलिया नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक सुंदर कोळी दिसत आहे. त्याच्या डोक्यावर बांधलेली खास रचना पाहून प्रत्येकजण थक्क होतो. खरं तर कोळ्याच्या डोक्यावर मोराच्या पिसासारखा रंगीबेरंगी पडदा दिसतो. या पिसाऱ्याला कोळी उचलताना आणि हलवताना दिसतो आहे.
व्हिडीओ व्हायरल होत आहे
सध्या कोळ्याचा हा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओने यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. बातमी लिहीपर्यंत या व्हिडीओला सोशल मीडियावर एक लाख 44 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 9 लाईक्स मिळाले आहेत. त्याच वेळी, आश्चर्यचकित यूजर्स सतत कमेंट करताना दिसतात.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)