Black Tiger Spotted In Odisha : सोशल मीडियावर एका दुर्मिळ वाघाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या वाघाला पाहून युजर्स चकित झाले आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. तुम्हीही असा वाघ अद्याप पाहिला नसेल हा अतिशय दुर्मिळ प्रजातीचा वाघ आहे. हा व्हिडीओ एका वन विभाग अधिकाऱ्यांनी शेअर केला आहे. अगदी काही कालावधीत हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर सध्या हा दुर्मिळ वाघ प्रचंड चर्चेत आहे. ओडिसामधील व्याघ्र प्रकल्पात या दुर्मिळ वाघाचं दर्शन झालं आहे.


आयएफएस अधिकारी सुसंता नंदा (IFS Officer Susanta Nanda) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत एका दुर्मिळ वाघाचं दर्शन घडवलं आहे. नंदा यांनी अत्यंत दुर्मिळ अशा काळ्या वाघाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हो तुम्ही अगदी योग्य वाचताय, 'काळा वाघ' (Black Tiger). सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दुर्मिळ काळा वाघ दिसेल. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.


हा व्हिडीओ शेअर करत नंदा यांनी कॅप्शन दिलं आहे की, 'वाघ हे भारताचील जंगलांच्या शाश्वततेचे प्रतीक आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त दुर्मिळ मेलानिस्टिक वाघाचा एक मनोरंजक व्हिडीओ शेअर करत आहे. या व्हिडीओमध्ये वाघ आपला प्रदेश (Territory) निश्चित करताना दिसत आहे.
ओडिसा व्याघ्र प्रकल्पातील हा वाघ अत्यंत दुर्मिळ प्रजातीचा आहे.'






या आधीही काळा वाघ दिसल्याचा दावा


काळा वाघ पाहिल्याचा दावा 1773 सालापासून केला जात आहे. म्यानमारमध्ये 1913 मध्ये आणि चीनमध्ये 1950 मध्ये असेच दावे करण्यात आले होते. जप्त केलेली काळी वाघाची कातडी 1993 मध्ये नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री दिल्ली येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती.


संबंधित इतर बातम्या