Anand Mahindra Viral Tweet : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर काहीतरी हटके, जुगाड पाहून ते अनेकदा प्रभावित होतात, अशा गोष्टींचं ते नेहमीच कौतुक देखील करतात. नुकताच त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक देशी जुगाडचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून त्यांच्यासह नेटकरीही भारावून गेले आहेत.

Continues below advertisement


आधुनिक युगात देशी जुगाड


सध्याच्या आधुनिक युगात माणसांची अनेक काम वेगवेगळ्या मशीन करताना पाहायला मिळतात. अनेक काम यंत्रांमुळे सोपी होतात. पण या आधुनिक यंत्रांचा शोध लागण्यापूर्वी माणसाला सर्व काम मेहनतीने करावी लागत होती. आता ही काम मशीनमुळे झटपट होतात. मात्र या आधुनिकीकरणाचा आपला आरोग्यावर होणाऱ्या वाईट परिणामाकडे आपण दुर्लक्ष करतोय, असं सांगण्याचा प्रयत्न आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर करत केला आहे. 


देशी भात गाळप यंत्राचा व्हिडीओ


आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एका देशी जुगाडू भात गाळप यंत्राचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला एका उपकरणाच्या मदतीने धान्याचं गाळप करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की या देशी जुगाड यंत्रामध्ये पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाने मोठं चाक फिरवून त्याचा वापर धान्य कुटून त्यांतून तांदूळ वेगळं करण्यासाठी केला जात आहे.


प्राचीन टिकाऊ उपकरणाची प्रशंसा


आनंद महिंद्रा यांना हे प्राचीन धान्य गाळपाचं यंत्र फारच आवडलं आहे. त्यांनी या उपकरणाची प्रशंसा करत म्हटलं आहे की, सध्याची आधुनिक जगात जिथे अनेक इलेक्ट्रिक उपकरण उपलब्ध आहेत. तिथे हे प्राचीन उपकरण फारच टिकाऊ आणि उत्तम आहे.






त्यांनी ट्विटला कॅप्शन देत म्हटलं आहे की, 'हे उपकरण उत्तम आणि कुशल आहे. ज्या युगात आपण इलेक्ट्रॉनिक यंत्रानी वेढलेले असताना, हे प्राचीन यांत्रिक उपकरण फक्त कार्यक्षम आणि टिकाऊच नाही तर सुंदर देखील आहे. हे केवळ एक यंत्र नसून शिल्प आहे.' या व्हिडीओवर युजर्सनी कमेंट्सचा पाऊस पाडत कौतुक केलं आहे.


'महिंद्रा समुहा'चे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचा पद्म पुरस्काराने सन्मानही करण्यात आला आहे. आनंद महिंद्रा यांचे सोशल मीडियावर 94 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आनंद महिंद्रा वेळोवेळी विविध व्हिडीओ शेअर करत भन्नाट कलाकारीचं दर्शन घडवत असतात.