3D Paintings : जगभरात अनेक कलाकार आहे. ज्यांच्या कलाकृती किंवा पेंटिंग्स जगभरात अतिशय प्रसिद्ध आहेत. आजकाल थ्रीडी आर्ट (3D Art) अधिक प्रसिद्ध आहे. थ्रीडी पेंटिंग अतिशय वास्तविक असतात, या पेंटिंग पाहून ही पेंटिंगमधील वस्तू किंवा दृश्य खरं आहे की चित्र यावर विश्वास बसत नाही. अशा थ्रीडी आर्टचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. थ्रीडी आर्ट करणाऱ्या कलाकारांची एक वेगळीचं शैली असते. अगदी स्वप्न सत्यात उतरवतील अशी.


असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. या व्हिडीओमध्ये एक थ्रीडी आर्ट करणारा कलाकार भन्नाट थ्रीडी पेंटिंग काढताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा कलाकार थ्रीडी पेंटिंग कॅनव्हासवर नाही, तर रस्त्यावर आणि भिंतींवरील फटी किंवा अडगळीच्या जागेत काढत आहे. हे थ्रीडी आर्ट पाहून तुम्हालाही ही पेंटिंग आहे की खरं यावर विश्वास बसणार नाही. या थ्रीडी पेंटिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. 






सोशल मीडियावर व्हायरल आलेला हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला या कलाकाराच्या उत्कृष्ट कलाकारीची कल्पना येईल. हा कलाकार तडे गेलेल्या रस्त्यावर, भेगा पडलेल्या भिंतीवर, बाकड्यावर भन्नाट थ्रीडी आर्ट करताना दिसत आहे. हे थ्रीडी आर्ट पहिल्या क्षणी पाहता खरं असल्याचा भास होत आहे. तुम्ही अशी सुंदर आणि भन्नाट कलाकारी आधी कुठेही पाहिली नसेल हे मात्र नक्की.


हा थ्रीडी आर्टचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत बारा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्सने या व्हिडीओला लाईक आणि शेअर केलं आहे. अनेक नेटकरी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत थ्रीडी कलाकाराची प्रशंसा करत आहेत.


ट्विटरवर Tansu Yegen नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिलं आहे की, 'आपल्याला रस्त्यात खड्डे दिसतात, पण कलाकार 3D कलाकार कलेसाठी संधी शोधतात.'