Trending News : 'जंगलाचा राजा' म्हणवल्या जाणाऱ्या सिंहापेक्षा म्हशीची किंमत जास्त असू शकते? असे तुम्ही कधी ऐकले आहे का? तुम्ही विचार करत असाल, हे कसे होऊ शकते, परंतु हे खरे आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये सिंह विकले जात आहेत, ज्यांची किंमत म्हशीपेक्षा कमी आहे.


आफ्रिकन सिंहांना मिळतेय म्हशींपेक्षाही कमी किंमत


समा टीव्हीच्या वृत्तानुसार, लाहोर सफारी प्राणीसंग्रहालय प्रशासन आपल्या काही आफ्रिकन सिंहांना प्रति सिंह 150,000 रुपये (पाकिस्तानी) या किंमतीत विकण्यास तयार आहे. त्या तुलनेत एक म्हैस ऑनलाइन मार्केटप्लेसवर 3,50,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.


ऑगस्टमध्ये 12 सिंह विकणार!


मिळालेल्या माहितीनुसार, लाहोर सफारी प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपले 12 सिंह विकण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, जेणेकरून पैसे उभे केले जातील. विक्रीसाठी तीन सिंहीण आहेत, ज्या खाजगी गृहनिर्माण योजना किंवा पशुसंवर्धन संस्था, प्राणीमित्र उत्साही व्यक्तींना अतिशय परवडणाऱ्या किमतीत विकल्या जाऊ शकतात.


पाकिस्तान श्रीलंकेच्या वाटेवर


पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीतून जात आहे हे सर्वश्रुत आहे. यामुळेच आता पाकिस्ताननेही कमी-अधिक प्रमाणात श्रीलंकेचा मार्ग अवलंबला आहे. डळमळीत आर्थिक परिस्थिती पुन्हा रुळावर आणण्यासाठी शाहबाज शरीफ सरकारने आपली सरकारी मालमत्ता परदेशी लोकांना विकण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत लाहोर सफारी प्राणीसंग्रहालयाने जंगलाच्या राजाला अवघ्या दीड लाख रुपयांना विकण्याची तयारी केली आहे, तर लाहोरमध्येच एका चांगल्या जातीच्या म्हशीची किंमत सिंहाच्या तिप्पट आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Mumbai Mega Block Updates : मुंबई लोकल संबंधित मोठी बातमी, आज अनेक मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या


Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींची 'मन की बात' आज; नेमकी कोणती घोषणा करणार? देशवासियांचं लक्ष


Maharashtra Politics : घटनात्मक कोंडीच्या प्रसंगी सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निर्णय देईल, नीलम गोऱ्हेंचा विश्वास


व्हायरल ऑडिओ क्लिपप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप