Nepal Boys Gets PM Modi Special Autograph : बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळला भेट दिली. लुंबिनी येथील भगवान बुद्धांच्या जन्मस्थानी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि भारतीय समुदायाच्या लोकांनी पीएम मोदींचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, पंतप्रधान मोदींचा एका मुलाला ऑटोग्राफ देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंतप्रधान एका तरुण कलाकाराला ऑटोग्राफ देत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. भारतीय समुदायाचे लोक पीएम मोदींचे जंगी स्वागत करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असून यावेळी पंतप्रधान मुलाच्या स्केचवर ऑटोग्राफ देताना दिसत आहेत.


नेपाळमध्ये मुलाच्या स्केचला मिळाला खास ऑटोग्राफ! 


व्हायरल व्हिडिओमध्ये मुलाने कागदावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भगवान बुद्धांसोबतचे चित्र बनवले होते. या स्केचमध्ये पीएम मोदी भगवान बुद्धांचे आशीर्वाद घेताना दाखवले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी कलाकृतीवर ऑटोग्राफ देताना दिसत आहेत. यावेळी या ठिकाणी जमलेल्या जमावाच्या वतीने ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देत आहेत. पंतप्रधान हात जोडून जनतेला भेटताना दिसत आहेत.


 






लुंबिनी येथील मायादेवी मंदिरात पंतप्रधानांनी पूजा केली


पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणावरून नेपाळला पोहोचले. नेपाळचे पंतप्रधान गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर आले होते. लुंबिनीमध्ये पंतप्रधान मोदींचे नेपाळचे पंतप्रधान देउबा आणि त्यांच्या पत्नीसह अनेक मंत्र्यांनी स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त लुंबिनी येथील मायादेवी मंदिरात पूजाही केली. हे ठिकाण भगवान बुद्धांचे जन्मस्थान मानले जाते.


महत्त्वाच्या इतर बातम्या