Trending Video : जोड्या स्वर्गात बनतात, असा हिंदू संस्कृतीमधील समज आहे. मात्र काही जोड्या पहिल्यावर यावर विश्वास बसणंच कठीण होऊन बसतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्याच कारण काय आहे तुम्हाला व्हिडीओ बघूनच कळेल. सोशल मीडियावर हे वधू-वर जोरदार चर्चेत आहेत. ज्याची जोडी पाहून लोकांना अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या नवरा आणि नवरीच्या वयात खूप मोठा फरक असल्याचं व्हिडीओ पाहून स्पष्ट होतं आहे.


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वराच्या कपड्यांमध्ये दिसणार्‍या व्यक्तीवरून स्पष्टपणे अंदाज लावला जाऊ शकतो की त्याचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल. तर वधूकडे पाहून तिचं वय सुमारे 25 वर्षे असल्याचं समजतं. दोघांच्या वयात जवळपास 35 वर्षांचा फरक असल्याचं दिसून येत आहे. व्हिडीओवरून अंदाज लावला जाऊ शकतो की लग्न पार पडलं आहे आणि नववधू तिच्या सासरच्या घरी बसली आहे. यावेळी नवराही तिच्या जवळ बसला आहे.






 


दोघांच्या वयात एवढा फरक पाहून लोकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. व्हिडीओमध्ये वराच्या कपड्यांमध्ये दिसणारी व्यक्तीचे केसही वाढलेल्या वयामुळे पूर्ण पांढरे झाले आहेत. तर वधूच तरुण असून तिचं वय सुमारे 25 वर्षे असल्याचं दिसून येत आहे. याच कारणामुळे दोघांच्या वयात मोठा फरक आहे हे स्पष्ट कळत आहे. दरम्यान, व्हिडीओ बनवणारी व्यक्ती व्हिडीओ बनवण्यासाठी वधूच्या दिशेने कॅमेरा करतो. यावेळी नवरी लाजते आणि तिचा चेहरा लपवते.


हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील एका अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी भरपूर कमेंट करत आहेत आणि मजा घेत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या